मालमत्ता कर चुकवणा-यांवर आता महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना काळानंतर मालमत्ता कराच्या वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. दुस-या बाजूला करआकारणी न झालेल्या मालमत्तांचा शोध सुरु केला आहे. वसई – विरार महापालिकेने आतापर्यंत थकबाकीदारांच्या 4 हजार 823 मालमत्ता जप्त करत, 288 कोटींची विक्रमी वसुली केली आहे.
…म्हणून जप्त केल्या मालमत्ता
मालमत्ता करवसुलीसाठी वसई – विरार महापालिकेने कंबर कसली आहे. मागील वर्षात मालमत्ता कराची वसुली 221 कोटी झाली होती. ही वसुली मागील काही वर्षांच्या तुलनेत विक्रमी होती, मात्र कोरोना उपाययोजना, तसेच विकासकामांसाठी निधीचा वापर झाल्याने पालिकेने करवसुलीसाठी प्रयत्न सुरु केले. नोव्हेंबर महिन्यात 162 कोटींची वसुली झाली होती. त्यामुळे पालिकेने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करवुसलीचे उद्दिष्ट्य 400 कोटी ठेवले. करवसुलीसाठी पालिकेने अनेक वर्षांपासून थकीत करधारकांच्या मालमत्ता जप्त करण्यास नोव्हेंबरपासून सुरुवात केली.
( हेही वाचा :युक्रेनला अजून भयानक दिवस पहावे लागणार! पुतिन यांच्याशी बोलल्यावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भीती )
…तर मालमत्तांचा लिलाव
अद्याप 1 हजार 829 थकबाकीधारकांनी करभरणा केला नसून, त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. कराचा भरणा केला नाही, तर या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याचं, वसई विरार महापालिका उपायुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितलं आहे.
Join Our WhatsApp Community