हिमाचल प्रदेशात डिझेलवरील व्हॅटमध्ये 3 रुपयांची वाढ; मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर किती?

145

हिमाचल प्रदेशात सत्तांतरानंतर राज्य सरकारने डिझेलच्या किंमतीवरील व्हॅटमध्ये 3 रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वी राज्यात डिझेल 83.02 रुपये प्रति लिटर होते. त्यात आता वाढ होऊन डिझेलचे दर 86.05 रुपये प्रति लिटर झाले आहेत.

( हेही वाचा : फ्रांसचा महिलांच्या सुरक्षेविषयी महत्वाचा निर्णय; बलात्काराच्या आरोपीला नाही मिळणार फ्रांसचा ऑस्कर अवॉर्ड )

यासोबतच देशातील महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमधील काही शहरांमध्ये इंधन दरांत किरकोळ बदल झालेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 0.44 रुपयांनी वाढून 107.51 रुपये आणि डिझेल 0.41 रुपयांनी वाढून 94.14 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तसेच उत्तर प्रदेश, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि गोव्यात पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवे दर जारी केले जातात. पेट्रोल, डिझेलच्या दरात एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. दरम्यान, देशात तब्बल 7 महिन्यांहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. परंतु, दरम्यानच्या काळात काही राज्यांनी व्हॅटमध्ये केलेली कपात यामुळे काही राज्यांतील दरांमध्ये बदल झाले होते.

देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.