वेद हा भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचा खजिना असून संपूर्ण विश्वाची उत्पत्ती आहे. वेदात संपूर्ण जगाला जोडण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केले.
दिल्लीतील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे श्रीपाद दामोदर सातवळेकर लिखित वेदांच्या हिंदी भाष्याच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन सर सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, वेद आणि भारत दोन्ही एकच आहेत. ते सनातन धर्माचे आधार आहेत. वेदांमध्ये ज्ञान, विज्ञान, गणित, धर्म, वैद्यक आणि संगीताचे प्रचंड माहिती दडली आहे.
भागवत पुढे म्हणाले की, वेदांच्या मंत्रांमध्ये अंकगणित, घन आणि घनमूळ ही तत्त्वेही स्पष्टपणे सांगितलेली आहेत. वेदांमध्ये संपूर्ण जगाच्या कल्याणाची चर्चा आहे. वेद जगातील सर्व मानवतेच्या एकतेचा मार्ग दाखवतात. सनातन संस्कृतीत जीवन जगण्यासाठी स्पर्धा करण्याची गरज नाही, हे वेदांनी आपल्याला शिकवले आहे, असेही ते म्हणाले.
मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी ‘सत्यम् ज्ञानम् अनंतम् ब्रह्म’ आहे असे सांगत म्हटले की, आपल्या ऋषीमुनींनी ही दृष्टी डोळ्यासमोर ठेवून जगाच्या कल्याणासाठी वेदांची रचना केली होती. आपल्या देशात मुलाचे पोट भरले की आई तृप्त होते. विज्ञान यावर विश्वास ठेवणार नाही पण हा भौतिकवादाच्या पलीकडचा आनंद आहे. वेदांचा आधार सर्व ज्ञान प्रणालींमध्ये दिसून येतो. वेदांच्या अभ्यासाने संपूर्ण मानवजातीचे ज्ञान होत राहील.
कार्यक्रमात महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरीजी महाराज म्हणाले की, आक्रमणकर्त्यांनी वेद आणि सनातन गुरुकुल नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या ऋषीमुनींच्या आठवणीत लिहिलेले वेद नष्ट करू शकले नाहीत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत वेद शाश्वत आहेत आणि राहतील. (Mohan Bhagwat)
संघप्रमुखांच्या आशीर्वादाने वेदांच्या 10 खंडांतील हिंदी भाष्याचा शुभारंभ संपन्न झाला. विहिंपचे संरक्षक आणि केंद्रीय व्यवस्थापकीय समितीचे सदस्य दिनेश चंद्र यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांगितले की, श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी भाष्य केलेल्या या चार वेदांपैकी आठ हजार पाने स्वाध्याय मंडळ पारडी, गुजरात आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या वेद अभ्यास केंद्राने प्रकाशित केली आहेत. नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी, दिल्लीने ते प्रकाशित करण्यासाठी खूप कष्ट घेतले. जवळपास 10 वर्षांपासून हे कार्य सुरु होते. या उदात्त कार्यात गुंतलेल्या अभ्यासकांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. (Mohan Bhagwat)
(हेही वाचा- गणेशोत्सवात जे हानीकारक आहे, ते ईदमध्येही हानीकारकच; Bombay High Court ने निकाली काढली याचिका)
कार्यक्रमाला देशातील अनेक संत, संघ, विश्व हिंदू परिषद यांच्यासह अनेक धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांचे अधिकारी आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. (Mohan Bhagwat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community