Veer Savarkar : ऐतिहासिक शेतकरी मेळावे घेणारे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

31
Veer Savarkar : ऐतिहासिक शेतकरी मेळावे घेणारे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

भारत राष्ट्र तेव्हाच समृद्ध व सक्षम होईल जेव्हा सर्व स्तरातील वर्ग सशक्त होईल. भारत हा फार पूर्वीपासून शेतीप्रधान देश राहिलेला आहे. मात्र परकीय आक्रमणानंतर इथल्या शेतकऱ्यांची हालत बिकट झाली. आपण इतकी वर्षे ‘जय जवान, जय किसान’ घोषणा देत राहिलो. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा व्यवस्थित प्रयत्न झाला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) सर्वांगिण विकासावर भर देतात. सावरकरांचे हिंदुत्व हा कट्टर विचार नसून एक परिपूर्ण मानवी संकल्पना आहे. या संकल्पनेत राष्ट्राचे रक्षण, राष्ट्राची प्रगती, लोकसंख्या, उद्योग अशा सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. त्यामुळेच सावरकर विचारांच्या संघटनांनी अशा सर्व बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा आदर्श कोल्हापूर येथील ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’ आपल्याला घालून देत आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ विविध स्तरावर कार्यरत असून सावरकर (Veer Savarkar) विचार जनमानसात रुजवत आहे. विशेष म्हणजे या संस्थेतर्फे शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला जातो. यामध्ये तज्ञ मार्गदर्शन करतात आणि शेतीमध्ये वृद्धी होण्यासाठी उपायही सांगतात. चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाला ‘ऐतिहासिक’ म्हणून संबोधले आहे. या संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. पूर्वी सावरकरांच्या (Veer Savarkar) गीतांची सीडी संस्थेतर्फे वाटल्या जात. जेणेकरून अनेक लोकांपर्यंत सावरकर पोहोचू शकतील. सावरकर जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करुन लोकांचे प्रबोधन केले जाते. तसेच परशुराम जयंती साजरी केली जाते. सावरकर विचारांच्या संस्थांना सहकार्य केले जाते व विविध संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबवले जातात.

(हेही वाचा – Hawker Action : गोरेगावमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाईचा जोर वाढला)

सावरकर (Veer Savarkar) हे उत्तम कलाकार होते हे लक्षात घेऊन बालगोपाळांसाठी विविध उपक्रम व स्पर्धा घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. कराओके गाण्यांच्या स्पर्धा आयोजित करुन कलागुणांची जोपासना केली जाते. स्वच्छता हा कोणत्याही सज्जन हिंदू माणसाचा मुख्य गुण असतो. संस्थेतर्फे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले जाते व या अभिनायात सहभागी होणाऱ्यांचा तुळशी वृंदावन देऊन सत्कार केला जातो. महिलांसाठी देखील अनेक उपक्रम राबवले जातात. सफाई कामगार महिलांचा साडी-चोळी देऊन सत्कार केला जातो. स्वच्छता कर्मचारी हे खरे तर देवदूत आहेत. त्यांच्यामुळे आपण अनेक आजारांपासून मुक्त राहतो. त्यामुळे संस्थेचे हे कार्य उल्लेखनीय आहे.

तसेच वर उल्लेख केल्याप्रमाणे शेतकरी मेळाला हे देखील एक अद्भुत व अद्वितीय कार्य आहे. संस्थेतर्फे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कर्तृत्ववान महिला, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व इत्यादी मान्यवरांचा सत्कार केला जातो. हा सत्कार म्हणजे या मान्यवरांप्रति व्यक्त केलेली कृतज्ञता आहे असे संस्थेचे पदाधिकारी शामजी जोशी यांचं म्हणणं आहे. आणखी एका उल्लेखनीय कार्याची दखल घेतलीच पाहिजे. महाद्वार रोडवरील अनेक व्यापाऱ्यांचा सत्कार करुन उद्योगाला चालना दिली जाते. हे व्यापारी ८०-१५० वर्षांपासून इथे व्यापार करत आहेत. अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे व्यावसायिक परंपरेचे कौतुक व्हायलाच हवे. सावरकरी विचार उद्योजकांचा द्वेष करायला शिकवत नाही. उद्योजक हे राष्ट्राच्या उन्नतीत मोठा हातभार लावतात. त्यामुळे त्यांचा सत्कार हा राष्ट्राच्या उन्नतीचा मार्ग होय! अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना कार्य करण्याचे आणखी बळ मिळो ही सदिच्छा! (Veer Savarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.