
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५९ व्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘माझी जन्मठेप’ (Mazi Janmathep) या वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) पुस्तकाच्या अभिवाचनाचा रंगमंचीय नाट्याविष्कार दि. २२ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. अनेक राष्ट्रप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. अभिवाचनानंतर सर्वांनी उभे राहून कलाकारांच्या प्रयत्नांना दाद दिली.
( हेही वाचा : BMC : मुंबईत हातगाड्यांवर व्यवसाय करण्यास बंदी; तरीही रस्ते अडवून राहतात उभ्या)
सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त (Veer Savarkar Atmarpan Din) सादर झालेल्या या अभिवाचन कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती अनंत वसंत पणशीकर व नाट्यसंपदा कला मंच यांची असून दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी केले आहे. तसेच यासाठी संकलन अलका गोडबोले यांनी केले. शब्दोच्चारासंबंधातील मार्गदर्शन सुहास सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, संगीत मयुरेश माडगावकर यांनी केले. तसेच अभिवाचनाच्या कार्यक्रमाची प्रकाश योजना शाम चव्हाण यांनी केली. या अभिवाचनामध्ये शंतनू अंबाडेकर (Shantanu Ambadekar), गौरव निमकर, नवसाजी कुडव, समर्थ कुलकर्णी, शिबानी जोशी हे कलाकार सहभागी झाले. या रंगमंचीय आविष्कारासाठी मंजिरी मराठे यांचे विशेष साहाय्य लाभले.

यावेळी अभिवाचन कार्यक्रमाचे निर्माते अनंत वसंत पणशीकर (Anant Vasant Panshikar) म्हणाले की, ‘माझी जन्मठेप’ या वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) पुस्तकाच्या अभिवाचनाचा रंगमंचीय नाट्याविष्काराचा हा २६ वा प्रयोग आहे. २ वर्षापूर्वी याच नाट्यगृहात या कार्यक्रमाचा पहिला शुभारंभाचा प्रयोग सादर झाला होता. तरी संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही करत असतो. त्यामुळे राष्ट्रप्रेमी प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचे जास्तीत जास्त प्रयोग कसे होतील, यासाठी आम्हाला सहकार्य करावे, असे पणशीकर म्हणाले.
‘माझी जन्मठेप’ परिस्थितीशी झगडत जगण्याची प्रेरणा देणारा ग्रंथ
दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) म्हणाल्या की, या कार्यक्रमासाठी पणशीकरांच्या संकल्पनेला दाद द्यायला हवी. कारण ‘माझी जन्मठेप’ (Mazi Janmathep) हे वीर सावरकरांचे पुस्तक ४०० पानांचे असून या अभिवाचनात त्यातील ६० पानांचे कसदार सादरीकरण याठिकाणी झालेले आहे. माझी जन्मठेप हे पुस्तक लहान मुलांनी आणि तरुणांनी वाचायला हवे. कारण आज तरुण मुलं शुल्लक कारणांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या परिस्थितीतून जगले ते ऐकल्यावर, वाचल्यावर अनेकांना जगण्याची नवी प्रेरणा मिळेल. कारण ‘माझी जन्मठेप’ परिस्थितीशी झगडत जगण्याची प्रेरणा देणारा ग्रंथ आहे, असे मंजिरी मराठे म्हणाल्या.
अनुभवा अंदमानातील मृत्यूचा पराभव आणि सावकरांचा जय !
वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची, म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली. तेथील त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती; पण त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा जय. ‘माझी जन्मठेप’ हे वीर सावरकर यांनी अंदमानात काळ्या-पाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे. (Veer Savarkar) तरी या पुस्तकावर आधारित असे हे अभिवाचन राष्ट्रप्रेमींना स्फुर्ती देणारे ठरले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community