वीर सावरकर प्रेमींनी भगूरमध्ये साजरा केला ‘महाराष्ट्र दिन’

महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी असल्याने रविवार, १ मे रोजी सकाळपासूनच भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात सावरकर प्रेमींची प्रचंड गर्दी दिसून आली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, मुलुंड या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थळ दर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत 80 सावरकर प्रेमी मुलुंड मुंबई येथून जन्मभूमीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी सावरकर जन्मभूमीचे दर्शन घेतले.

वीर सावरकरांचा जीवनपट सावरकर प्रेमींसमोर उभा केला

या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष एकनाथराव शेटे यांनी तसेच स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर व सहव्यवस्थापक भूषण कापसे यांनी स्मारकाबाबत सविस्तर माहिती सर्वांना दिली. त्यानंतर आठवडे बाजार येथील स्वातंत्र्यवीर सावरकर संकुलामध्ये ज्येष्ठ सावरकर अभ्यासक पार्थजी बावस्‍कर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात त्यांनी वीर सावरकर यांच्या जीवनाचा संपूर्ण जीवनपट सर्व सावरकर प्रेमींसमोर साक्षात उभा केला, हे व्याख्यान ऐकताना सर्वच श्रोते अत्यंत मंत्रमुग्ध झालेले दिसून आले. व्याख्यानानंतर सर्वांनी खंडेराव मंदिर येथे जाऊन अष्टभुजा देवीचे दर्शन घेतले. वीर सावरकर जन्मस्थान दर्शन मोहिमेसाठी मुलुंड येथून आलेल्या सावरकर प्रेमींना या ठिकाणी भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे मनोज कुवर, प्रमोद आंबेकर, मंगेश मरकड, योगेश बूरके, प्रशांत लोया, भूषण कापसे, संभाजी देशमुख, शिरीष पाठक, संतोष मोजाड, आकाश नेहरे, गणेश राठोड, केतन कुवर, संस्कार मरकड, भैरव आंबेकर, ओम देशमुख, विजय घोडेकर काका इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

(हेही वाचा अशीही नोकरी… काहीही न सांगता 90 दिवस निवांत घरी बसूनही मिळतो पगार!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here