राहुल गांधींच्या विरोधात वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून मानहानीचा दावा दाखल

194

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतेच ब्रिटनमध्ये एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. यामुळे सावरकर प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे येथील शिवाजी नगर न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात बुधवार, १२ एप्रिल रोजी फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी? 

राहुल गांधी यांचे नुकतेच ब्रिटनमध्ये एक भाषण झाले. यावेळी त्यांनी सांगितले की, एका मुस्लिम व्यक्तीला सावरकरांचे ५-६ सहकारी मारहाण करत असताना ते दृश्य पाहून सावरकरांना आनंद होत होता, असे सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. ५-६ माणसे एका माणसाला मारत असतील, तर ती कायरता होते, जर लढायचे असेल तर एका बरोबर एकाने लढावे, असे राहुल गांधी त्यावेळी म्हणाले.

राहुल गांधींनी भावना दुखावल्या

राहुल गांधी यांनी जो प्रसंग सांगितला आहे, तो खोटा आणि कपोलकल्पित आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रसंग वीर सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी वरील विधान केले. ज्यामुळे वीर सावरकर यांचा वंशज म्हणून माझ्या भावना दुखावल्या आहेतच, त्याच बरोबर सावरकर प्रेमींच्याही भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आपण पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी जे विधान केले आहे आहे ते वीर सावरकर यांनी कोणत्या पुस्तकात लिहिले आहे, हे त्यांनी पुराव्यासह सिद्ध करावे अन्यथा त्यांच्यावर भा.दं.वि. कलम ४९९ आणि ५०० नुसार शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाला केली आहे. १५ एप्रिल रोजी न्यायालयाने आम्हाला बोलावले आहे, असे सात्यकी सावरकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितले.

(हेही वाचास्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथील स्मारक ‘स्फूर्तीस्थळ’ होणार; सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.