रत्नागिरीत वीर सावरकरनिर्मित हिंदू धर्मध्वज फडकला! 

178

क्रांतिकारकांचे मुकुटमणी वीर सावरकर यांनी त्यांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले होते, तेव्हा त्यांनी समाजप्रबोधन, जाती निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलनाचे महान कार्य केले. त्यामुळे वीर सावरकर आणि रत्नागिरी यांचे अनोखे नातेसंबंध निर्माण झाले होते.  अशा रत्नागिरीला आता वीर सावरकर यांचे स्मरण कायम होत राहणार आहे. कारण रत्नागिरीतील स्वातंत्र्य लक्ष्मी चौक येथे वीर सावरकरनिर्मित धर्मध्वज फडकवण्यात आला आहे. यासाठी गुढीपाडवा हे निमित्त ठरले.

रत्नागिरी येथे स्वातंत्र्य लक्ष्मी चौक आहे. तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्याठिकाणी वीर सावरकर यांनी हिंदू एकतेसाठी तयार केलेला हिंदू धर्मध्वज उभारण्यात आला. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला हा ध्वज उभारण्यात आला. हा ध्वज ७ फूट उंचावर फडकवण्यात आला आहे, तर ध्वजाची लांबी ६ फूट आहे.

(हेही वाचा हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीसह वीर सावरकरनिर्मित भगवा ध्वज उभारुन करा!)

रत्नागिरी नगर परिषदेने दिली परवानगी 

रत्नागिरीतील स्वातंत्र्य लक्ष्मी चौक येथे वीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला वीर सावरकरनिर्मित हिंदू धर्मध्वज फडकवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या चौकात वीर सावरकरनिर्मित हिंदू ध्वज कायम भडकत राहणार आहे, अशी माहिती सावरकरप्रेमी रवींद्र दामले यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.