Veer Savarkar गोरक्षणाच्या बाजूने होते, दिनेश गुंडूराव यांचे विधान पूर्णपणे खोटे – रणजित सावरकर

51
Veer Savarkar गोरक्षणाच्या बाजूने होते, दिनेश गुंडूराव यांचे विधान पूर्णपणे खोटे - रणजित सावरकर
Veer Savarkar गोरक्षणाच्या बाजूने होते, दिनेश गुंडूराव यांचे विधान पूर्णपणे खोटे - रणजित सावरकर

कर्नाटकचे आरोग्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) नेते दिनेश गुंडूराव (Dinesh Gundurao) यांच्या वादग्रस्त विधानानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) गोहत्येच्या विरोधात नव्हते आणि त्यांनी स्वतः गोमांस खाल्ले होते, असे विधान दिनेश गुंडूराव यांनी नुकतेच केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी गुंडूराव यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध केला आहे. दिनेश गुंडूराव यांच्याविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचेही म्हटले आहे.

(हेही वाचा – Israel एअर स्ट्राईकमध्ये हमास सरकारच्या प्रमुखासह ३ नेते ठार)

हिंदूंचे जातींमध्ये विभाजन करून निवडणुका जिंकण्याची काँग्रेसची इच्छा

गुंडूराव यांच्या वक्तव्याचा निषेध करतांना रणजित सावरकर म्हणाले, “दिनेश गुंडूराव यांचे विधान पूर्णपणे खोटे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना वारंवार कलंकित करणे, हे काँग्रेसचे धोरण राहिले आहे. विशेषतः जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा ते असे वाद निर्माण करतात, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली होती. आता राहुल गांधींविरोधात पुणे आणि नाशिकमध्ये समन्स बजावण्यात आले आहेत. त्यामुळे राहुल गांधी सावरकरांवर वक्तव्ये करणे टाळत आहेत; पण आता त्यांचे नेते वक्तव्ये करत आहेत. ‘सावरकर ब्राह्मण होते आणि गांधी ब्राह्मण नव्हते’, अशा प्रकारे विधाने ते करत आहेत. हिंदू समाजाचे जातींमध्ये विभाजन करून निवडणुका जिंकण्याची काँग्रेसची इच्छा आहे. अशी वक्तव्ये करून आता त्यांनी त्यांचा खरा चेहरा दाखवला आहे. फूट पाडा आणि राज्य करा, हे ब्रिटिशांचे धोरण होते. काँग्रेस आता त्यावरच चालत आहे.

गोपालन हवे, गोपूजन नको !

“स्वातंत्र्यवीर सावरकर गोमांस खात असल्याचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. ही विधाने सत्य नाहीत. मराठीतील त्यांचा मूळ लेख होता – ‘गोपालन हवे, गोपूजन नको !’गाय हा हिंदूंसाठी उपयुक्त पशू आहे. त्यामुळे तिला आईचा दर्जा देण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर म्हणत असत की, केवळ गोपूजन पुरेसे नाही, तुम्हाला गायींचे संरक्षण करावे लागेल. केवळ संरक्षण करायचे नाही, तर तिच्यासंदर्भात वैज्ञानिक संशोधन करावे लागेल, कारण ते समाजासाठी उपयुक्त आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते गोरक्षा परिषदेचे अध्यक्षही होते. लेखाच्या शीर्षकामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, गायींचे संगोपन केले पाहिजे, याचा अर्थ गायींचे संरक्षण केले पाहिजे.”

मानहानीचा खटला दाखल करणार

रणजित सावरकर पुढे म्हणाले, गोरक्षणाची चर्चा करणारे सावरकर गोहत्येला पाठिंबा देऊ शकत नाहीत. गायींच्या संरक्षणाची मागणी करणारा पहिला माणूस गोहत्येच्या बाजूने कसा असेल? दुसरे म्हणजे, तो माणूस कोणीही असो, मी त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. काँग्रेसने नेहमीच भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास दडपण्याचा कट रचला आहे.

सावरकरांच्या वक्तव्यामागे काय आहे पार्श्वभूमी ?

पूर्वी जेव्हा सैन्य भारतावर आक्रमण करत असे, तेव्हा परदेशी आक्रमणकर्ते त्यांच्यापुढे गायींचा कळप ठेवत असत. परकीय आक्रमकांच्या समोर गायी असल्यामुळे आपले सैनिक शस्त्रे उचलणार नाहीत आणि त्यांचा पराभव होईल, असे आक्रमकांचे त्यामागे षडयंत्र असे. त्यामुळे सावरकर त्या वेळी म्हणाले की, “काही गायींना वाचवण्यासाठी तुम्ही साम्राज्य गमावले आणि साम्राज्य गमावून तुम्ही त्याच आक्रमकांचे गुलाम बनता. आक्रमकांच्या समोर असलेल्या काही गायी तुम्ही वाचवल्या; पण म्हणूनच आज लाखो गायींची कत्तल केली जात आहे.”

मोहनदास गांधींना कधीही तुरुंगात पाठवण्यात आले नाही. जेव्हा मुस्लिम आणि काँग्रेस नेत्यांना तुरुंगात पाठवण्यात आले, तेव्हा ते तुरुंग नव्हते, त्यांना राजवाड्यात पाठवण्यात आले होते. अहमदनगरमधील किल्ला एक राजवाडा होता, गांधींना राजवाड्यात ठेवण्यात आले होते, तर सावरकर (Veer Savarkar) आणि इतर कैद्यांना अंदमानमध्ये पाठवण्यात आले. तिथे त्यांना तेल काढण्यासाठी कोलू ओढणे भाग पडले. लोकांना आता हे सत्य कळू लागले आहे. त्यामुळे काँग्रेसवाले आता घाबरले आहेत. त्यामुळे ते अशा गोष्टी सांगून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.