आषाढी एकादशी अवघ्या महाराष्ट्रात उत्साहात साजरी होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी २५० किमी पायीवारी करत लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पोहचतात. जगात असे एकमेव उदाहरण असावे. ऊन, वारा, पाऊस कोणत्याही कारणाने वारी (Ashadhi Wari) खंडित झाली नाही. आहे पण आपल्यातील किती जणांना माहिती आहे की, आजपासून ठीक ८० वर्षांपूर्वी याच वारीवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय बिटिशांनी घेतला होता; परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका पत्राने ब्रिटिशांनी त्यांचा हा निर्णय मागे घेतला होता. त्यामुळे वारीचे हे अखंडत्व अबाधित राहण्यात वीर सावरकर यांनी १५ जून १९४४ रोजी लिहिलेल्या त्या पत्राचा मोलाचा सहभाग आहे. हे पत्र सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे. हे पत्र स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आले आहे, तसेच या पत्राचा संकलित भागाची पोस्ट वेदांत मदाने यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर केली आहे.
वीर सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले होते?
“काहीतरी चुकीच्या समादेशामुळे राज्यपालांनी ही बंदी घातलेली दिसते. त्यांना बहुधा पंढरपूरचे महत्त्व माहीत नसावे. ख्रिश्चनांना रोम जितके पवित्र वाटते तितकेच मराठ्यांना पंढरपूर पवित्र वाटते. इतिहास काळात पंढरपूरची मूर्ती फोडणार्या मुसलमान सरदाराचे शीरच मराठ्यांच्या राजाने छाटून टाकले आणि ते थेट विजापूरला घुसले. हाजच्या यात्रेला या युद्ध काळातही अनुज्ञा देणार्या शासनाने पंढरपूर यात्रेला (Ashadhi Wari) बंदी करावी हा हिंदूंवर अन्याय आहे. यासंबंधात मी राज्यपालांना पत्र लिहून कळविले आहे की ह्या यात्रेला अनुज्ञा दिल्याने युद्ध प्रयत्नात किंवा अन्नधान्य उत्पादनात नि वाटपात कोणताही अडथळा येणार नाही. तरी ही परिस्थिती लक्षात घेऊन ही बंदी उठवावी.”
वीर सावरकरांच्या ह्या सावधानतेमुळे किंवा शासनाला बंदी घालणे इष्ट न वाटल्याने, कसेही असो पण पंढरपूरच्या यात्रेवरची बंदी उठली आणि ती यात्रा प्रतिवर्षापेक्षाही अधिक उत्साहाने आणि हिंदुसंघटनेच्या जागृतीने यशस्वी झाली. त्यासंबंधी ५ जुलै १९४४ रोजी काढलेल्या पत्रकात वीर सावरकर लिहितात –
“पंढरपूरमध्ये एकाही यात्रेकरूने प्रवेश करू नये अशी आज्ञा असताही तेथे दीड लाख यात्रेकरू जमले. त्यांना धान्य देऊ नये अशी आज्ञा असताही त्या भागातील शेतकर्यांनी चपात्यांचे ढीग रचून यात्रेकरूंना अन्न पुरविले. उपहारगृहांना अन्न देण्याची बंदी असल्यामुळे तर तेथील नागरिकांनी हिंदू सभेच्या स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाने वेळी स्वतः अर्धपोटी राहून यात्रेकरुंना भोजन दिले. अशा प्रकारे पंढरपूरची यात्रा (Ashadhi Wari) यशस्वी झाली. तिकडील गावोगावच्या हिंदूंनाही कळले की हिंदू महासभा हीच ह्या कार्यासाठी लढणारी संस्था आहे. भागानगर नि भागलपूरनंतरचा हिंदू सभेचा हा एक मोठा विजय आहे. यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो.”
Join Our WhatsApp Community