पुणे येथील अभिनव भारत संस्कृती या रांगोळी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने विविध वयोगटातील मुला-मुलींनी दादर येथील सावरकर सदन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. शनिवार, 18 जानेवारीला मुलांनी सावरकर सदनामध्ये जावून वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) स्मृतींना वंदन केले. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. तेथील सर्व उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी वीर सावरकरांचा जीवनपट दर्शविणारा लाईट अँड साऊंड शो पाहून मुले अधिक प्रभावित झाली.
याप्रसंगी वीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी अभिनव भारत संस्कृती संस्थेचे पदाधिकारी आणि मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी मुलांनी सावरकर स्मारकातील 1857 पासूनच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी सशस्त्र क्रांती केली, त्यांच्याविषयीचे भीत्ती चित्रे पाहिली. तसेच तिथे असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचेही दर्शन घेतले. त्याच बरोबर स्मारकातील विविध उपक्रमांच्या विषयी माहिती जाणून घेतली. स्मारकातील रायफल शूटिंग रेंजलाही भेट दिली. या मुलांनी आधी सावरकर सदन त्यानंतर सावरकर स्मारक इथे सुंदर रांगोळी काढून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
अभिनव भारत संस्कृती ही रांगोळी क्षेत्रात काम करणारी पुण्यामधील संस्था आहे. या संस्थेच्या वतीने आम्ही मुलांना घेऊन दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आम्हाला आमचा वेळ कसा गेला हे कळलेच नाही. ज्या अनुषंगाने आपण या स्मारकाकडे बघायला जातो, त्याच्या व्यतिरिक्त वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) दृष्टिकोणातील स्मारक आम्हाला इथे बघायला मिळाले. वीर सावरकरांचा भविष्यकालीन जो दृष्टिकोन होता, तो इथे आम्हाला पाहायला मिळाला. इथे येवून मुलांनी स्फूर्ति घेतली आहे, तसेच स्मारकाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचेही त्यांनी ठरवले आहे. संध्याकाळी जो लाइट अँड साऊंड शो होता तो अप्रतिम होता, त्याच्याविषयी बोलण्यासाठी शब्दच नाही. 40 मिनिटांत वीर सावरकरांचा (Veer Savarkar) जीवनपट या शोमधून बघायला मिळतो. हा अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. सगळ्यांनी या स्थळाला भेट दिली पाहिजे.
– सागर कुलकर्णी, अभिनव भारत संस्कृती.
Join Our WhatsApp Community