स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई यांच्या वतीने भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने नाशिक येथील देवळाली कॅम्प येथील सुप्रसिद्ध डॉ. सुभाष गुजर विद्यालयाला स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Veer Savarkar) मूर्ती आणि पुस्तक भेट देण्यात आले. याद्वारे वीर सावरकर यांच्या जीवनातील आदर्श आणि त्याग यांचा आदर करण्यास शाळेस प्रोत्साहित करण्यात आले.
(हेही वाचा – Konkan Railway: खोळंबलेल्या एसटीमुळे कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना मदतीचा हात; आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा)
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बन्सीलाल हेमलाल गाडीलोहार यांना भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकचे मनोज कुवर आणि भूषण कापसे यांच्या हस्ते सावरकरांची मूर्ती देण्यात आली. या वेळी शिक्षक सोपान आनंदा कांगणे, सौ. अनुपमा सुरेश पाटील कर्मचारी राहुल ससाणे उपस्थित होते.
वीर सावरकरांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या विचारधारेशी संबंधित पुस्तक शाळेला भेट देण्यात आले. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना सावरकरांच्या विविध पैलूंविषयी माहिती मिळेल आणि त्यांचे विचार वाचनातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या भेटीच्या प्रसंगी सावरकरांच्या देशभक्ती आणि क्रांतीकारी विचारांबद्दल चर्चा झाली. या वेळी शाळेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारक मुंबईचे आभार मानण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community