मी जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा आदर्श आणि त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचे आकलन केले असेल तर ते आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. ब्रिटिशांनी स्वातंत्रपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतातल्या सरकारांनी वीर सावरकर यांना ज्या काही यातना दिल्या, त्या सगळ्याला त्यांनी तोंड दिले आणि सगळ्यात वाईट परिस्थितही ते खंबीरपणे उभे राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बुद्धिमत्ता आणि उच्च विचारांचा आधार घेऊन आपण कर्करोगावर मात केली आहे आणि विजय मिळवला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांचा अनुभव सांगितला.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येते गुरुवार, ८ जुलै रोजी कॅन्सर या रोगापासून बरे झालेल्या लोकांसाठी “आनंद मेळावा” ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पोंक्षे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते. हा मेळावा रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी आयोजित केला होता. कॅन्सर झालेल्या किंवा होऊन गेलेल्या लोकांसाठी हे संमेलन, मुळ्ये गेल्या ७-८ वर्षांपासून आयोजित करत आहेत.
(हेही वाचा MMRDA : एमएमआरडीएने भरले मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे)
काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनाही कर्करोग झाला होता, मात्र त्यांनी या दुर्धर आजारावर मात करून आज ते पुन्हा एकदा मोठ्या जोमाने सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. १९८८ पासून पोंक्षे हे मराठी चित्रपट, मराठी नाटक आणि मराठी मालिकांमध्ये अभिनेते म्हणून काम करत आहेत. कर्करोगावर हिमतीने मात करून त्यांनी “हिमालयाची सावली” या नाटकपासून पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत हे नाटक गाजवले.
कर्करोग झालेल्यांनी सकारात्मक विचार करावा
कुठलाही आजार आधी मनाला लागतो आणि नंतर त्या आजाराची लागण शरीराला होते. त्यामुळे, आपले मन शांत करा, आपले दुःख इतरांना सांगा, मोकळे व्हा आणि मनात सकारात्मक विचार ठेवा, असा मंत्रही पोंक्षे यांनी यावेळी दिला. अशा प्रकारचा मेळावा घेण्याची संकल्पना रंगकर्मी अशोक मुळ्ये यांना कशी सुचली, हे त्यांना विचारल्यानंतर मुळ्ये म्हणाले, माझी पुतणी तिची मैत्रिण माया सावंतसह एकदा मला भेटायला आली होती, तेव्हा त्या बोलत असताना माया हिने, तिला ७ वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता तिचा कॅन्सर बरा झाला आहे. हे ऐकून मला जाणवले की, असे बरेच लोक असतील, ज्यांना हा आजार झाला असून त्यांना मानसिक आधाराची गरज भासत असेल आणि कोणीतरी आपले दुःख समजून घ्यावे अशी इच्छा असेल, त्या दिवसापासून आपण कर्करोगावर मात केलेल्या लोकांचे संघटन करून त्यांचा मेळावा घेण्यास सुरुवात केली, असे मुळ्ये म्हणाले.
या “आनंद मेळाव्याची” सुरूवात केतकी भावे-जोशी यांच्या “या सुखांनो या” या गाण्याने झाली. त्यानंतर कॅन्सरपासून बरे झालेल्या लोकांनी आपापले मनोगतही व्यक्त केले. संदीप पाटोळे व इतर गायकांच्या सुंदर गाण्यांनी या मेळाव्याची सांगता झाली.
Join Our WhatsApp Community