वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनची (Veermata Jijabai Bhosle Park) संख्या ७ वर्षांच्या कालावधीत सातवरून १८ वर गेल्याने प्राणीसंग्रहालय प्रशासनाने आता त्यांच्यासाठी जागा वाढविण्याचा विचार केला आहे.
प्राणिसंग्रहालयाने 2016 मध्ये दक्षिण कोरियातील सोल येथील कोएक्स मत्स्यालयातून ३ नर आणि ५ मादी असे ८ पेंग्विन आणले होते. यावर्षी ३ बाळ पेंग्विन जन्माला आल्याने पेंग्विनची संख्या आता १८ वर पोहोचली असून पेग्विनच्या पिलांची नावे कोको, स्टेला आणि जेरी, अशी ठेवण्यात आली आहेत.
(हेही वाचा – Mumbai Trans Harbour Link Road : २५ डिसेंबरचा मुहूर्त हुकणारं ? मात्र जाणून घ्या किती द्यावा लागणार टोल)
पेंग्विनना राहण्यासाठी ९ मार्च २०१७ रोजी १९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन जागेची सोय करण्यात आली होती, मात्र पेंग्विनची वाढती संख्या विचारात घेता प्राणीसंग्रहालय मोठ्या जागेची योजना करत आहे. त्यामुळे पेंग्विनच्या पिलांना नव्या जागेत हलवण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, सध्याची नवीन जागा १७५० चौरस फूट क्षेत्रफळ आणि १५० चौरस फूट आहे. या मत्सालयात २५ पेंग्विन राहू शकतात.
तसेच एका अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, आम्ही जलचर वनस्पती आणि प्राण्यांच्या किमान ४६ विविध प्रजातींचे मत्स्यालय बांधण्याची आणि सध्याच्या एका मागे पेंग्विन मत्स्यालयाचा विस्तार करण्याची योजना आखली होती. नवीन मत्स्यालयाच्या योजनेचा विचार होत आहे तसेच पेंग्विन मत्स्यालयाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे ठेवण्यात आला आहे.
प्राणीसंग्रहालय आणि मत्स्यालयांच्या संघटनेच्या नियमांनुसार, प्रत्येक पक्षासाठी आवश्यक असलेल्या आवश्यक असलेल्या जागेच्या क्षेत्रफळानुसार नवीन जागेचा विस्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community