राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शहरात भाज्यांचे दरही वाढल्याचे पहायला मिळत आहे. पावसामुळे मुंबईत होणारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून भाज्यांचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत.
( हेही वाचा : समृद्धी महामार्गाच्या सुसाट प्रवासासाठी नेमका किती टोल भरावा लागणार? जाणून घ्या)
…तोपर्यंत हे दर वाढलेले राहतील
नाशिक, पुणे, गुजरातहून मुंबईत भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या ५० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत तर अनेक भाज्याही खराब झाल्या आहेत. जोपर्यंत भाज्यांची आवक बाजारात पूर्वीप्रमाणे होत नाही तोपर्यंत हे दर वाढलेले राहतील असे सांगण्यात येत आहे.
भाज्यांचे आताचे दर
- भेंडी – ४० रुपये किलो
- टोमॅटो – ४० ते ६० रुपये किलो
- कोथिंबीर जुडी – ६० ते ७० रुपये
- मेथी – ७० रुपये
- पालक – ५० रुपये
- फ्लॉवर – ६० रुपये
- ढोबळी मिरची – ९० रुपये
- गवार – ६० रुपये
- लिंबू – ३० ते ४० रुपये
भाज्यांचे दर आधीपेक्षा जवळपास ४० टक्क्यांनी वाढले आहेत. राज्यभरात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. भाज्यांचे दर वाढल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.
Join Our WhatsApp Community