Vegetables Price Hike: सामन्यांच्या खिशाला कात्री; भाज्यांचे वाढले भाव, कडधान्ये ही कडाडली

100
Vegetables Price Hike: सामन्यांच्या खिशाला कात्री; भाज्यांचे वाढले भाव, कडधान्ये ही कडाडली
Vegetables Price Hike: सामन्यांच्या खिशाला कात्री; भाज्यांचे वाढले भाव, कडधान्ये ही कडाडली

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session 2024) महागाईचा मुद्दा पेटणार आहे. भाज्यांची डबल सेंच्युरी कायम असून कडधान्येही चांगलीच कडाडली आहेत. इंधनाचे दरही गगनाला भिडले असून गृहिणींच्या किचनचे बजेट अक्षरशः कोलमडलेले असून अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्यासाठी विरोधकांनी एकजुटीने व्यूहरचना आखल्याने एनडीए सरकारसाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे.  (Vegetable Price Hike)

मुसळधार पाऊस (Heavy Rain) बळीराजासाठी आनंददायी ठरला असला तरी फळे, भाज्यांचेही (Vegetables Price) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून केंद्र सरकार आणि राज्य सरकाराच्या गैरव्यवस्थापनामुळे मुसळधार पावसात माल मार्केटमध्ये पोहोचतच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाज्या अक्षरशः सडून जात असून किरकोळ बाजारात येईपर्यंत भाज्या डबल सेंच्युरी गाठत असल्याचे अनेक भाजी विक्रेत्यांनी सांगितले. सेंच्युरी गाठलेला टोमॅटो अजूनही महागच असून १०० रुपयांना मिळणारी ब्रोकोली ४०० रुपये किलोने मिळत आहे, तर कोथिंबिरीची जुडीही ४० रुपयांवर गेली आहे. शिमला मिर्चीही तब्बल २०० रुपये किलोने मिळत आहे, तर १२० रुपये किलोने मिळणारे आले आता २०० रुपये किलोवर गेले आहे. (egetables Price Hike)

(हेही वाचा – Women’s Asia Cup 2024 : युएईवर मोठा विजय मिळवत भारताची उपान्त्य फेरीत धडक )

४८ टक्के कुटुंबे आर्थिक तंगीचा सामना करत असल्याचा आरोप ‘इंडि’ आघाडीने (India Alliance) केला आहे. आमदनी अठन्नी, खर्चा रुपया अशी त्यांची स्थिती असून मिळकत आणि बचत दोन्हीही घटले आहे. या पाश्र्वभूमीवर सरकार यावेळच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देईल का, असा सवाल सामान्य नागरिकांना पडलेला आहे. (Vegetables Price Hike)

 हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.