Vegetables Price Hike : भाजीपाल्यांचे दर वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे चित्र

116
Vegetables Price Hike : भाजीपाल्यांचे दर वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे चित्र

पावसाळा संपल्यानंतर आता भाजीपाल्यांचे दर वाढू लागले आहेत. रब्बी पेरणीची तयारी व कांदा लागवड, यामुळे कमी क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड आहे. कोथिंबीर, टोमॅटो, गवारी, लसूण, दोडका, कारले, हिरवी मिरची, वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. (Vegetables Price Hike)

(हेही वाचा – परशुराम महामंडळाच्या अध्यक्षपदी Ashish Damle यांची निवड)

कोणतीही भाजी करायची झाली की, जिरे-मोहरी आणि लसूण आवश्यक असतो. परंतु, मागील महिनाभरात लसणाची आवक कमी झाल्याचा थेट परिणाम दरावर झाला आहे. दीड महिन्यापूर्वी अवघ्या १०० ते १३० रुपये किलो दरात मिळणारा लसूण सध्या ३५० रुपये किलोवर पोचला आहे. काही दिवसांत लसणाचे दर झपाट्याने वाढत आहेत. सध्या बाजारात लसणाचे भाव ३४० रुपये किलोपर्यंत आहे. (Vegetables Price Hike)

(हेही वाचा – बेस्टमध्ये खासगी बसेसची सेवा घेण्याचा आमचा प्रयत्न फसला; UBT Shiv Sena च्या सुहास सामंतांनी केले मान्य)

खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे नुकसान झाले आहे. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे लसूण लागवड विलंबाने झाली असून तो लसूण बाजारात यायला आणखी काही दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे आणखी काही दिवस लसणाची फोडणी महागच असणार आहे. (Vegetables Price Hike)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.