Vehicle Theft : एका दिवसात मुंबईकरांची ६ ते ७ वाहने चोरीला; दोन महिन्यांत ३६३ गुन्ह्यांची नोंद

42

मुंबईत (Mumbai) जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान मुंबईत विविध गुन्ह्यांसंबंधित ८१०८ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यामध्ये वाहनचोरीच्या ३६३ गुन्ह्यांचा समावेश आहे. (Vehicle Theft) गेल्या वर्षी याच दोन महिन्यांत वाहनचोरीचे ४३४ गुन्हे नोंदवण्यात आले होते. गेल्या २ महिन्यांत मुंबईतून ३६३ वाहने चोरीला गेली आहेत. यापैकी अवघ्या १४० वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. या आकडेवारीतून दिवसाला ६ ते ७ वाहने चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवेल, सकाळचा भोंगा नाही; Chandrashekhar Bawankule यांचा राऊतांना टोला)

गेल्या वर्षभरात वाहन चोरीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police0) दप्तरी २५८९ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी १४४० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०२३ मध्ये हाच आकडा २६७१ होता. गुन्हेगारी नियंत्रणासाठी गस्त वाढविण्याबरोबरच आस्थापनांबाहेर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे. जेणेकरून गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ही चोरीची वाहने बनावट क्रमांक लावून वापरली जातात. रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळी त्यांच्या पार्टची मुंबईसह मुंबई बाहेर विक्री करतात. मुंबईतही अनेक गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी केली जाते. भंगारामध्ये दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायची. त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी चोरून तिला भंगारातील दुचाकीचा नंबर चोरट्यांकडून दिला जातो.

चोरीची वाहने विकणाऱ्या अनेक टोळ्या मुंबई परिसरात सक्रिय असून त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. काही ठगांनी बनावट क्रमांक लावलेल्या दुचाकीची सोशल मीडियावरही (Social media) विक्री केल्याचे समोर आले आहे. मुंबईत आतापर्यंत दाखल वाहनचोरीच्या घटनांपैकी १४० गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. (Vehicle Theft)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.