१ जानेवारी २०२५ पासून स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणतेही साधन वापरून चेहरा झाकणे यावर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याच्या अंतर्गत सार्वजनिक कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी महिलांना चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही. या कायद्याचे उल्लंघन केल्यास अंदाजे ९६ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. (burqa ban)
(हेही वाचा – नौदलात एकाच दिवशी दाखल होणार तीन Battle Fleet; संरक्षण क्षेत्रात देश बनत आहे आत्मनिर्भर)
स्वित्झर्लंडपूर्वी बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरिया इत्यादी देशांमध्येही याविषयी कायदे करण्यात आले आहेत. वर्ष २०२२ मध्ये स्विस संसदेने महिलांना चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याच्या कायद्यावर मतदान केले होते. या वेळी १५१ सदस्यांनी बाजूने तर २९ सदस्यांनी विरोधात मतदान केले होते. त्यानंतर याविषयी कायदा संमत करण्यात आला. यापूर्वी २००९ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये जनमत चाचणीद्वारेच मिनार (मशिदीच्या आजूबाजूला बांधण्यात येणारे मनोरे) बांधण्यावर बंदी घालण्यात आली होती.
२०२२ मध्ये आला कायदा
२०२२ मध्ये राष्ट्रीय परिषदेने, स्वीस संसदेचे कनिष्ठ सभागृह, चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याच्या कायद्यावर मतदान केले. या कालावधीत १५१ सदस्यांनी बाजूने, तर २९ सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्यानंतर यासंदर्भात कायदा करण्यात आला.
हा प्रस्ताव उजव्या विचारसरणीच्या स्विस पीपल्स पार्टीने (एसव्हीपी) मांडला होता, तर केंद्र आणि ग्रीन्स पक्ष याच्या विरोधात होते. काही लोकांचे म्हणणे आहे की, हा कायदा मुस्लिम महिलांना अन्यायकारकपणे लक्ष्य करतो. या कायद्याचे समर्थन करणारे दावा करतात की, सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक मूल्य आणि सुरक्षिततेसाठी हे एक आवश्यक पाऊल आहे. (Switzerland)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community