Versova Illegal Construction : वर्सोव्यात इमारतींवर कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमाव आक्रमक; पोलिस सोबत असूनही कारवाई सोडून पळाले

1684
Versova Illegal Construction : वर्सोव्यात इमारतींवर कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमाव आक्रमक; पोलिस सोबत असूनही कारवाई सोडून पळाले

वेसावे (वर्सोवा) येथील किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील (सीआरझेड) अनधिकृत बांधकामाविरोधात मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या कारवाई मोहिमेत महापालिकेच्या पथकाला गुरुवारी अर्धवट कारवाई करत परतावे लागले. आजवर केल्या जाणाऱ्या कारवाईत महापालिकेला निर्विघ्न यश मिळत गेले असले तरी गुरुवारी दोन इमारतींवर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान मोठा जमावच पथकाच्या अंगावर धावून आला आणि ‘साहेबाला पकडा आणि मारा’ अशा घोषणा देण्यास त्यांनी सुरुवात केला. एका बाजूला जमावर अंगावर येत असताना पोलीस मात्र त्यावेळी त्यांच्या मदतीला धावून आले नाही. पोलिस त्या दरम्यान गायबच झाल्याने पालिकेच्या पथकाला स्वतःचा जीव वाचवत तिथून कारवाई अर्धवट सोडून निसटावे लागले. (Versova Illegal Construction)

वर्सोव्यातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (सीआरझेड) उद्भवलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (परिमंडळ-४) विश्वास शंकरवार आणि के विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नियंत्रणाखाली कारवाई करण्यात येत आहे. मागील ३ जून २०२४ पासून वेसावे गाव (शिवगल्ली) भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई सुरू असून आतापर्यंत या भागातील सात इमारतींवर कारवाई करून बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तळमजला आणि तीन मजली, चार मजली तसेच पाच मजली अशा स्वरुपाच्या इमारतींचा समावेश आहे. (Versova Illegal Construction)

(हेही वाचा – आमदार Meghna Bordikar यांनी फाईलमध्ये ठेवले पैसे; व्हिडिओ व्हायरल होताच सभागृहात चर्चा)

महापालिका प्रशासनाला होती ‘ही’ भीती 

बुधवारीही दोन इमारतींवर कारवाई केल्यांनतर गुरुवारीही दोन इमारतींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक पोलिस संरक्षणात वर्सोव्यात गेले असता, त्यांना वेगळाच अनुभव आला. गुरूवारी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी वर्सोव्यातील शिव गल्ली, धक्का जवळ, डोंगरी गल्ली येथील तळमजला ५ असणाऱ्या दोन अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू करण्यात आली होती. या अनधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील ८ कॉलम पोकलेन द्वारे तोडून उत्तर दिशेला इमारत पाडण्यात आली. ही इमारत पाडल्यानंतर सभोवताली संपूर्ण परिसरात धूळ पसरली व इमारत पडल्याच्या आवाजाने सगळी कडे शांतता पसरली. दरम्यान या कारवाईचे (पोलिस कुमक) नियोजन करताना असे दिसून आले की, पुरवलेला पोलिस बंदोबस्त अचानक त्या ठिकणावरून दिसेनासे झाला. त्यानंतर तेथील रहिवाशांचा घोळका जमा झाला. सदर जमलेल्या जमावाने तेथे उपस्थित असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर शिविगाळ करण्यास सुरूवात केली व तेथील काही उन्मंत रहिवाश्यांनी ‘साहेबांना पकडून मारा’ अशा प्रकारच्या घोषणा सुरू केल्या. अशाप्रकारच्या घोषणा सुरू होताच सगळा जमाव अधिकाऱ्यांवरती धावून आला, असे महापालिका प्रशासनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Versova Illegal Construction)

त्यावेळची तेथील परिस्थिती लक्षात घेता, तेथील महापालिका अधिकारी तेथे असलेल्या काही दुसऱ्या मार्गाने घाई घाईने स्वः ताचा बचाव करण्यासाठी तेथून निघून गेले. या घटनेच्या वेळी अधिकारी जर तेथील रहिवाश्यांच्या हातात सापडले असते तर अधिकाऱ्यांवर मारहाण करून विपरीत घटना घडली असती, अशीही भीती महापालिका प्रशासनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस हे त्यावेळी मागे राहिले. बांधकाम तोडताना धुळ उडाल्याने पोलिस मागे राहिले, त्यामुळे पोलिस त्याठिकाणी दिसून न आल्याने जमाव थोडासा आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. (Versova Illegal Construction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.