Versova Unauthorised Construction : वेसावे शिव गल्लीतील आणखी एक अनधिकृत इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त

750
Versova Unauthorised Construction : वेसावे शिव गल्लीतील आणखी एक अनधिकृत इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त

वेसावे (Versova) येथे अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली असूने या गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारती महानगरपालिकेच्या इमारत व कारखाने विभाग तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त पथकाच्या वतीने मंगळवारी ११ जून २०२४ जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. (Versova Unauthorised Construction)

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. वेसावे येथील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. त्यादृष्टीने कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. (Versova Unauthorised Construction)

New Project 2024 06 11T194350.306

मागील आठवड्यात दिनांक ३ आणि ४ जून २०२४ रोजी वेसावे येथे दलदलीचा भाग आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र (कोस्टल रेग्यूलेशन झोन) या ठिकाणची काही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली होती. वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या तीन इमारती उपायुक्त (परिमंडळ-४) विश्वास शंकरवार यांच्या नियंत्रणाखाली आणि सहाय्यक आयुक्त (के पश्चिम विभाग) डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने इमारत व कारखाने विभागाकडून ११ जून २०२४ निष्कासित करण्यात आल्या. यापैकी पहिल्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर एक मजला, दुसऱ्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले तर तिसऱ्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले असे स्वरुप होते. (Versova Unauthorised Construction)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : खरीप हंगामासाठी बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी)

महानगरपालिकेचे १० अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी, ५० कामगार अशा मनुष्यबळासह दोन पोकलेन संयंत्र, दोन इलेक्ट्रिक ब्रेकर्स, तीन गॅस कटर्स आदी संसाधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि महानगराच्या विकासाचे आणि नियमनाचे योग्य नियोजन करणे, हे कारवाईमागील उद्दिष्ट आहे. त्यामुळे, वेसावेसह अन्य कोणत्याही भागातील अनधिकृत बांधकामांना थारा दिला जाणार नाही. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. (Versova Unauthorised Construction)

New Project 2024 06 11T194629.160

दरम्यान, वर्सोवा येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिका के पश्चिम विभागाचे प्रभारी सहाय्यक अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर कोळेकर यांची बदली करण्यात आली. कामातील बेजाबदार, निष्काळजीपणा व उदासीनतेमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली झाल्याचे कारण देत त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिले असून ही चौकशी पूर्ण होईपर्यंत शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. के/प. प्रभाग क्र.५९ व ६३ या प्रभागातील अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणातील अनधिकृत फेरफार, मोकळ्या जमिनीवरील बांधकामे विशेषतः वर्सोवा येथील सागरी किनारा, सीआरझेड व दलदलीच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे आदी बाबत तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत होत्या. (Versova Unauthorised Construction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.