अकोला (Akola) शहरापासून जवळ असलेल्या भाकराबाद (मोरगाव भाकरे) येथील शेतात अत्यंत दुर्मिळ ‘मांडूळ’ जातीचा साप (Mandul snake) एका शेतात दिसला. या गावात राहणारे धीरज पाटील यांनी या सापाला गुरांच्या टिनशेडमध्ये पाहिले असल्याची माहिती तात्काळ सर्पमित्रांना (snake lovers) दिली.
मांडळ जातीचा साप अत्यंत दुर्मिळ असून त्याची लांबी ३ फूट असते. दुर्धर आजारावरील औषधांसाठी तसेच गुप्त धनाच्या शोधासाठी मांडूळ जातीच्या सापाची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप बिनविषारी त्याची हालचाल मंद, जाडसर शरीर, शेपटी आणि तोंडात साम्य असल्याने त्याला दुतोंड्या म्हणतात. अंधश्रद्धेमुळे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मांडूळ सापाच्या मातीमिश्रित विष्ठेमुळे जमीन सुपिक आणि भुसभुशीत होत असल्याने शेतीपिकाच्या उत्पादनात वाढ होत असल्याने मांडुळ सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली.
(हेही वाचा – GST Invoice Scam : मुंबईत 263 कोटींच्या बनावट जीएसटी चलन रॅकेटचा पर्दाफाश; एकाला अटक )
सर्पमित्र सुरज इंगळे, सुरज ठाकूर, अभय निंबाळकर यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून या सापाला पकडून वन विभागात त्यांची नोंदणी केली. त्यानंतर त्याला पातूर येथील वन परिक्षेत्रात सोडून देण्यात आले.