जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (Manik Bhide) यांचं बुधवार १३ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिक भिडे यांच्या निधनानं शास्त्रीय संगीत क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. संगीत क्षेत्रातून अनेक लोकप्रिय गायकांचा गुरु हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून माणिक भिडे (Manik Bhide) यांना पार्किन्सन्स या असाध्य व्याधीनं ग्रासलं होतं. त्यावर उपचारही सुरू होते. मात्र अखेर १३ सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, पुत्र व कन्या ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे असा परिवार आहे. माणिक भिडे यांच्या निधनाने संगीतक्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होते आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा १७वा दिवस, सरकारच्या शिष्टमंडळासोबत मध्यरात्री चर्चा)
गानसरस्वती किशोरी आमोणकर या प्रतिभावंत गुरूचे शिष्यत्व घेतल्यानंतर असिधारा व्रताप्रमाणे माणिक भिडे (Manik Bhide) यांनी त्यांच्याबरोबर दीर्घकाळ संगीतसाधना केली. आयुष्याच्या एका टप्प्यावर स्वत: गुरुच्या भूमिकेत शिरून त्यांनी पुढची पिढी घडवली.
शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी माणिक भिडे (Manik Bhide) यांना २०१७ साली राज्य शासनाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community