हिंदी कवी-कथाकार Vinod Kumar Shukla यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर; छत्तीसगडमधील लेखकाला पहिल्यांदाच मिळणार हा सन्मान

62
हिंदी कवी-कथाकार Vinod Kumar Shukla यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर; छत्तीसगडमधील लेखकाला पहिल्यांदाच मिळणार हा सन्मान
हिंदी कवी-कथाकार Vinod Kumar Shukla यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर; छत्तीसगडमधील लेखकाला पहिल्यांदाच मिळणार हा सन्मान

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायपूर (Raipur) येथील रहिवासी असलेले शीर्ष हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल (Vinod Kumar Shukla) यांना यावर्षींचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नवी दिल्लीत दि. २२ मार्च रोजी ज्ञानपीठ निवड समितीने यासंदर्भात घोषणा केली. विनोद कुमार शुक्ल (Vinod Kumar Shukla) हे रायपूरमध्ये (Raipur) राहतात आणि त्यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी राजनांदगाव येथे झाला. ते गेल्या ५० वर्षांपासून लेखक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘अभिषेक जय हिंद’ १९७१ मध्ये प्रकाशित झाला. त्यांचे कथासंग्रह ‘रुम ऑन अ ट्री’ आणि ‘कॉलेज’ हेदेखील खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच छत्तीसगडमधील (Chhattisgarh) लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार आहे. (Vinod Kumar Shukla)

( हेही वाचा : दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु ; CM Devendra Fadnavis यांचा नागपुरातून इशारा

विनोद कुमार शुक्ल (Vinod Kumar Shukla) यांच्या ‘नौकर की कमीज’ (Naukar Ki Kameez ), ‘खिलेगा तो देखेंगे’ आणि ‘देअर यूज्ड टू बी अ विंडो इन द वॉल’, ‘इफ इट ब्लूम्स वी विल सी’ या कादंबऱ्या हिंदीतील काही सर्वोत्तम कादंबऱ्यांपैकी एक मानल्या जातात. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणि कौल यांनी त्यांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर एक चित्रपटही बनवला होता.

विनोद कुमार शुक्ला (Vinod Kumar Shukla) यांना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जसे की गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, रझा पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार (Sahitya Akademi Award) (त्यांच्या ‘देअर यूज्ड टू बी अ विंडो इन द वॉल’ या कादंबरीसाठी). याशिवाय त्यांना मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार आणि पेन अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाबोकोव्ह पुरस्कार देखील मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारे ते आशियातील पहिले साहित्यिक आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.