मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये मागील काही दिवसांपासून गायत्री मंदिर (Gayatri Mandir) जमिनीवर असलेल्या मशिदीचे प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांसारख्या हिंदू संघटनांनी मशिदीचा विरोध करत पोलिसांनी कारवाई न केल्यास कारसेवा करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान मुस्लिम समाजाने ती जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. परंतु एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिम समाजाने ज्या जमिनीवर मशीद बांधली आहे, ती जागा हिंदू मंदिराच्या (Gayatri Mandir) नावे नोंदवलेली आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्राला नवीन संकल्पांसह मोठ्या उद्दिष्टांची गरज – PM Narendra Modi)
संपूर्ण प्रकरण जबलपूरच्या रांझी तहसीलाच्या हद्दीतील आहे. विश्व हिंदू परिषदेचे (Vishva Hindu Parishad) विभाग संयोजक सुमित सिंह यांनी सांगितले की, प्लॉट नंबर १६९ वर अनधिकृत मशीद उभारण्यात आलेली आहे. तसेच रेकॉर्डवर देखील येथील जमीन गायत्री बाल मंदिराच्या (Gayatri Mandir) आणि एका कुटुंबाच्या नावे नोंदवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम समाजाचे म्हणणे आहे की, मशीद ५० वर्षापूर्वी बांधण्यात आली होती. दरम्यान विश्व हिंदू परिषद (Vishva Hindu Parishad) या प्रकरणाला लॅण्ड जिहाद असल्याचे सांगत, तीन वर्षांपासून न्यायालयीन लढाई लढत आहे. मात्र हळूहळू मशिदीचे बांधकाम वाढवले जात आहे. ते रोखून त्यावर कारवाई न झाल्यास विश्व हिंदू परिषद (Vishva Hindu Parishad) कारसेवा करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान दि. २६ सप्टेंबर रोजी हिंदू संघटनांचे कार्यकर्ते संबंधित ठिकाणी जमा झाले. तसेच मशिदीच्या विरोधात घोषणाबाजी दिली. ही माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तरी हिंदू संघटनांनी (Vishva Hindu Parishad) प्रशासनाला १० दिवसाचा अल्टिमेटम देत, कारसेवेचा इशारा दिला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community