राज्यातील औरंग्याच्या सर्वच कबरी हटवा; Bajrang Dal आणि विश्व हिंदू परिषदेची मागणी

26
राज्यातील औरंग्याच्या सर्वच कबरी हटवा; Bajrang Dal आणि विश्व हिंदू परिषदेची मागणी
राज्यातील औरंग्याच्या सर्वच कबरी हटवा; Bajrang Dal आणि विश्व हिंदू परिषदेची मागणी

औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवण्याची मागणी बजरंग दलाने (Bajrang Dal) केली आहे. यासंदर्भात तिथीनुसार होणाऱ्या शिवजंयतीच्या दिवशी दि. १७ मार्चला राज्यभर मोहिम सुरु करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) के सन्मान में बजरंग दल (Bajrang Dal) मैदान मे… क्रूरकर्मा धर्मद्वेषी औरंग्याची कबर हटाव मोहीम विहिंप (Vishva Hindu Parishad) व बजरंग दलाने हाती घेतली असून, यासाठी राज्यव्यापी आंदोलने केली जाणार आहेत.

( हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण?

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील खुलताबाद (Khuldabad) येथे औरंगजेबाची (Aurangzeb) कबर आहे. पण याचं औरंगजेबाचा मृत्यू अहिल्यानगरच्या भिंगारजवळील आलमगीर (Alamgir ) येथे झाला आहे. आलमगीर येथेही त्याचे स्मृतीस्थळ आहे. त्यामुळे खुलताबाद येथील कबर काढण्यासह आलमगीर येथील स्मृतीस्थळही काढण्याची मागणी विश्व हिंदू परिषद (Vishva Hindu Parishad) व बजरंग दलाने (Bajrang Dal) केली आहे. तसेच कबर हटवण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हिंदू युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj ) हिंदू (Hindu) स्वराज्याचा तर या औरंगजेबाने कायम द्वेष केला. हिंदू प्रताप सूर्य छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ औरंग्याने केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी राणी येसूबाई व पुत्र शाहू महाराज यांना कैद केले. छत्रपती शाहू महाराजांचा धर्म परिवर्तनाचा प्रयत्न अनेक वेळा केला. त्यामुळे औरंग्याची कबर रतात असणे म्हणजे एक प्रकारे त्याने केलेल्या न्यायांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, असे म्हणणे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे आहे. (Bajrang Dal)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.