10 वी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट होणार आहे. त्यासाठी आलेले संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र रोड शो केला. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले की, ‘माझ्या भावा, भारतात आपले स्वागत आहे.’ (Vibrant Gujarat Global Summit)
(हेही वाचा – Akhilesh Yadav on RamMandir : अखिलेश यादव यांनी नाकारले राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण)
10 ते 12 जानेवारी दरम्यान होणार परिषद
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट गांधीनगर येथे 10 ते 12 जानेवारी दरम्यान होत आहे. यंदाची संकल्पना ‘गेट वे टू द फ्यूचर’ (Gateway to the Future) अशी आहे. यात 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्था आहेत. शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (United Arab Emirates) अध्यक्ष शेख महंमद बिन झायेद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) यांच्यासोबत रोड शो केला.
संयुक्त अरब अमिरातीबरोबर संबंधांमध्ये सुधारणा
2014 मध्ये पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. या सहकार्याचा दोन्ही देशांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींचे अबू धाबी (Abu Dhabi) येथे अशाच प्रकारे स्वागत करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ झायेद’ (Order of Zayed) प्रदान करण्यात आला. 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पाच वेळा संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली आहे. (Vibrant Gujarat Global Summit)
हेही पहा –