Vice Admiral AN Pramod : व्हाईस ॲडमिरल एएन प्रमोद यांची नौदल संचालन महासंचालकपदी नियुक्ती

233
Vice Admiral AN Pramod : व्हाईस ॲडमिरल एएन प्रमोद यांची नौदल संचालन महासंचालकपदी नियुक्ती
Vice Admiral AN Pramod : व्हाईस ॲडमिरल एएन प्रमोद यांची नौदल संचालन महासंचालकपदी नियुक्ती

व्हाईस ॲडमिरल एएन प्रमोद (Vice Admiral AN Pramod) यांनी नौदल संचालन महासंचालक (DIRECTOR GENERAL NAVAL OPERATIONS) म्हणून 15 जानेवारी 2024 रोजी पदभार स्वीकारला. ते गोव्यातील नौदल अकादमीच्या (Naval Academy) 38 व्या एकात्मिक कॅडेट अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असून भारतीय नौदलात (Indian Navy) 1 जुलै 1990 रोजी त्यांना नियुक्ती मिळाली.

(हेही वाचा – Shankaracharya : अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेली देशातील चार शंकराचार्यांची पीठे कोणती आणि काय आहेत त्यांची वैशिष्ट्ये?)

विविध पदांवर नियुक्ती

ध्वज अधिकारी ए एन प्रमोद कॅट ‘ए’ सी किंग हवाई संचालन अधिकारी आणि संप्रेषण व इलेक्ट्रॉनिक्स रणनीतिज्ञ आहेत. डीएसएससी वेलिंग्टन (नीलगिरी) इथून त्यांनी स्टाफ कोर्स केला असून गोव्यातील नौदल अकादमीतून नौदल हायर कमांड कोर्स केला आहे.

त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण सागरी नियुक्तीमध्ये पश्चिम ताफ्यात फ्लीट ऑपेरेशन्स अधिकारी, भारतीय नौदलाच्या अभय, शार्दूल आणि सातपुडाचे प्रमुख, राजपूतचे कार्यकारी अधिकारी, सुजाताचे सिग्नल आणि कम्युनिकेशन अधिकारी, आयएनएस किरपानचे तोफखाना अधिकारी II, यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – IndiGo get Cause Notice : ‘त्या’ वायरल व्हिडीओनंतर इंडिगो, मुंबई विमानतळाच्या ऑपरेटरला कारणे दाखवा नोटीस)

उत्क्रोश नौदल हवाई केंद्राचे प्रमुख

पोर्ट ब्लेअर येथे उत्क्रोश नौदल हवाई केंद्राचे ते प्रमुख होते आणि डीएसएससी वेलिंग्टन येथे संचालक स्टाफमध्येही ते होते. त्यांनी महत्त्वपूर्ण नियुक्तींवर काम केले असून त्यात सहसंचालक, नौदल हवाई स्टाफ  आणि सहसंचालक, संचालक आणि प्रधान संचालक विमान अधिग्रहण, यांचा समावेश आहे. ते  2016-19 आणि  2006-09 या कालावधीत  इंडियन स्ट्रॅटेजिक अँड ऑपरेशनल कौन्सिल (INSOC) आणि टॅक्टिकल ऑडिट ग्रुप (TAG) चे अनुक्रमे सदस्य होते.

ध्वज अधिकारी ए एन प्रमोद नौदल मुख्यालयात डेप्युटी कमांडंट,आयएनए, एसीएनएस (Air) या पदांवर काम केले असून ते महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे (Maharashtra Naval Area) ध्वज अधिकारी राहिले आहेत. (Vice Admiral AN Pramod)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.