आसामधील एका महिला डॉक्टरने हिंदु धर्म स्वीकारला त्यामुळे तिला तिचे कुटुंबिय धमकावत आहेत. यामुळे लपून राहावे लागत आहे, असे एका व्हिडियोमध्ये म्हटले आहे. 3 सप्टेंबर रोजी हा व्हिडियो सोशल मिडियाद्वारे व्हायरल झाला होता. या व्हिडियोच्या माध्यमातून एका महिला डॉक्टरने तिच्या कुटुंबियांवरच धमकावल्याचा आरोप केला आहे. या व्हिडियोची आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी दखल घेतली आहे. पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : जालना घटनेत पोलीस नाही तर त्यांना आदेश देणारे दोषी – राज ठाकरे)
सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडियोमध्ये एक महिला स्वत:ला आसाम मेडिकल कॉलेज आणि दिब्रुगढ येथील रुग्णालयातील एक महिला डॉक्टर असल्याचे सांगून तिचे कुटुंबीय तिला जाणूनबुजून हिंदू धर्म स्वीकारल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असे सांगत होती. या महिलेने अशीही माहिती दिली आहे की,तिचे कुटुंबिय तिचे लग्न एका मोठ्या मौलवीशी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे लग्न तिला अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे तिने हा व्हिडियो व्हायरल केला. सोशल मिडियावर व्हिडियो व्हायरल होताच, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी आसामच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची योग्य चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community