Siddhivinayak Prasad : ‘तो’ व्हिडिओ मंदिर परिसरातील नाही; सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण

99
Siddhivinayak Prasad : 'तो' व्हिडिओ मंदिर परिसरातील नाही; सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण
Siddhivinayak Prasad : 'तो' व्हिडिओ मंदिर परिसरातील नाही; सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण

तिरुपती बालाजीच्या प्रसादानंतर आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले दिसणारा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता गंभीर आरोप होत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदरांने पिल्ले दिली असल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे. सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या पाकिटांवर ही उंदरांची पिल्ले दिसत आहेत.

(हेही वाचा – Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून वांद्रे इथं प्लॉट)

हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर श्री सिद्धीविनायक देवस्थान समितीचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना आमदार सरवणकर म्हणाले, “समोर आलेला व्हिडिओ हा मंदिर परिसरातील नाही. यामागे कोणाचे तरी षडयंत्र आहे. कोणीतरी प्लास्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडिओ काढला असावा. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता ठेवली जाते.”

या प्रकरणाची चौकशी होणार – सुधीर मुनगंटीवार

सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदीर जाण्याचा हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. मंदिर प्रशासन देखील घडल्या प्रकाराची तपासणी करेल आणि योग्य ते स्पष्टीकरण देईल, असे त्यांनी म्हटले आहे. सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे पन्नास हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या पाकिटात प्रत्येकी 50 ग्रॅमचे दोन लाडू भक्तांना प्रसाद म्हणून वाटप केले जातात.

करोडो हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी येथील प्रसादाच्या लाडूमध्ये वापर करण्यात आलेल्या तुपामध्ये चरबी असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडू मध्ये देखील उंदीर असल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे या प्ररकणाची चर्चा सुरु झाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.