सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूला कोणतीही अन्यायकारक घटना घडली की, आपण त्या घटनेचे शुटिंग करून समाजमाध्यामांवर दाद मागतो किंवा विशिष्ट सरकारी यंत्रणेला टॅग करत जाब विचारतो आणि यावर नेटकरीही व्यक्त होतात. सध्या ९.३३ च्या कर्जत लोकलच्या महिला डब्यामधला व्हिडिओ फेसबुकवर प्रचंड व्हायरल होत असून यावर लोक व्यक्त होत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव रात्री महिलांच्या डब्यांमध्ये रेल्वेकडून पोलीस तैनात केले जातात.
( हेही वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून सात महिन्यांत ३६०० रुग्णांना २८.३२ कोटींची मदत )
सोशल मीडियावर संताप
या व्हायरल व्हिडिओमध्ये ९.३३ च्या लोकलमध्ये रेल्वे पोलीस महिला सुरक्षेच्या कारणास्तव रात्री प्रवास करताना दिसत आहे. परंतु भर गर्दीत इतर महिला प्रवासी उभ्याने प्रवास करताना हा पोलीस कर्मचारी मात्र कानात इअरफोन लावून गाणी ऐकत, विंडो सीटजवळ अगदी आरामात प्रवास करत आहे. यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गर्दीच्या वेळेत महिला डब्यांमधून बसून प्रवास करण्यापेक्षा ज्या डब्यांमध्ये खरंच गरज आहे तिथून प्रवास करा अशाप्रकारच्या प्रतिक्रिया लिहित नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महिलांना रात्रीच्यावेळी सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वेकडून रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत महिला डब्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रेल्वे पोलीस किंवा होमगार्डची नियुक्ती केली जाते. यानुसार व्हायरल व्हिडिओमधील संबंधित कर्मचारी ड्युटीवर रुजू झाला परंतु महिला प्रवासी उभ्याने प्रवास करताना, असे बसून गाणी ऐकत प्रवास करणे योग्य नाही अशा कमेंट सोशल मीडियावर येत आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid08nTiiFyjBdgRHCici5DJdJGkNCZAmoUbppe3DBd2NMqXus93hh8gNU5Wi5de19aGl&id=100001596699530&sfnsn=wiwspwa&mibextid=6aamW6
Join Our WhatsApp Community