विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे, बैठका, संवाद राज्यभर चालू आहे. अशातच भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेने महायुतीची चिंता वाढवली आहे. विदर्भात (Vidarbha) भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला (Mahayuti) केवळ 25 जागा मिळतील, असे समोर आले आहे.
(हेही वाचा – Veer Savarkar यांचा सल्ला पाळला असता, तर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला नसता; रणजित सावरकर यांचे मत)
विदर्भात २५ पैकी भाजपला 18 जागा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात भाजपाला केवळ 4 जागा मिळणार आहे, असे या सर्व्हेतून समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी झपाटून काम चालू केले आहे. पराभवाची कारणे शोधत महायुतीचे नेतेही विविध दौरे आयोजित करून लोकांशी जोडलेले रहाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत विदर्भाविषयी समोर आलेल्या आकडेवारीनंतर महायुतीचे नेते कोणती उपाययोजना काढणार, हे पहाणे महत्त्वाचे आहे. (Vidhansabha Election 2024)
Join Our WhatsApp Community