मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात २५ मार्च रोजी ‘विद्या – सपनो की उडान’ या शिक्षणावर आधारित हिंदी चित्रपटाच्या विशेष प्रिमियर शोचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गम भागात शाळा सुरु होण्याच्या प्रेरणादायी प्रवासाचे वर्णन (Hindi Film) ‘विद्या – सपनो की उडान’ चित्रपटात करण्यात आले आहे. या विशेष प्रीमियरला ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर (Swapnil Savarkar), ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी, रिअल कॅलिबर प्रॉडक्शनचे चित्रपट निर्माते तेजोराज पटवाल आणि वेंकट पुंडीर आणि कार्यकारी निर्माता सुदीप जुगरन हे देखील उपस्थित होते. (Vidya – Sapno Ki Udan )
( हेही वाचा : Bangladesh Unrest : ७ महिन्यांत १४० कापड कारखाने बंद; १ लाख लोक बेरोजगार)
विद्या- सपनो की नहीं, देश की उडान- रणजित सावरकर
‘विद्या – सपनो की उडान’ (Vidya – Sapno Ki Udan ) नाही, तर ‘देश की उडान’ आहे. शिक्षण हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. इंग्रजांनी भारतात शिक्षणपद्धती लागू केली, ती प्रशासकीय कर्मचारी आणि कारकूनांची निर्मिती करण्यासाठी. आजही काही प्रमाणात तशाच पद्धतीच्या शिक्षणाचा वापर केला जात आहे. असे होऊ नये, यासाठी शिक्षणाचा जास्तीतजास्त प्रसार करणे, ही काळाची गरज आहे, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी ‘विद्या – सपनो की उडान’ या हिंदी चित्रपटाच्या प्रिमियर शो दरम्यान केले.
‘हे’ आहेत कलाकार
‘विद्या – सपनो की उडान’ (Hindi Film) चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सहयोगी दिग्दर्शक संजीव दास (Sanjeev Das) , संगीत दिग्दर्शक नवीन शिवराम, कॅमेरामन हर्ष शर्मा, निर्मिती नियंत्रक शीनु कौर, गीतकार विराट भट्ट, संपादक विकास सिंह आणि कला दिग्दर्शक अपूर्व बॅनर्जी यांनी योगदान दिले आहे, तर अभिनेता सुशांत खंडया, एकता तिवारी, कृती, भावना रोकडे यांच्यासह बॉलिवूड आणि उत्तराखंडमधील कलाकार सतीश शर्मा, शैल शिवराम, मानसी मिश्रा, जयती, राजन तिवारी, पल्लवी पाठक, दीपक बुंगवाल, मनिल मेहता, विकास शिना, सुशील यादव, अमिताभ घोष, रमेश रावत, कवरदीप सिंग आणि बाल कलाकार तेजस्विनी गंगोला, यशिका आणि सरांश जयसिंघानी यांनी काम केले आहे. (Vidya – Sapno Ki Udan)
रेखाचा संघर्ष आणि ‘विद्या’चा शिक्षण प्रवास
‘विद्या – सपनो की उडान’ या चित्रपटाचे चित्रीकरण चमोली जिल्ह्यातील राज जाट यात्रेचा शेवटचा थांबा असलेल्या बन गावात झाले आहे. हे एक दुर्गम आणि आव्हानात्मक क्षेत्र आहे. हा चित्रपट शिक्षणाच्या थीमवर आधारित आहे. या प्रदेशात शाळा सुरु होण्याच्या प्रेरणादायी प्रवासाचे वर्णन (Hindi Film) या चित्रपटात करण्यात आले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे, या भागात शैक्षणिक संस्थांचा अभाव आहे, ज्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. रेखा हे या चित्रपटाचे मुख्य पात्र असून विद्या नावाच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंबहूना गावातील सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी रेखा, दीपक आणि फौजी चाचा या पात्रांनी केलेला संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. (Vidya – Sapno Ki Udan)
गावातील काही मुले शिक्षणासाठी इतरत्र कशी जातात, हे या कथेत अधोरेखित केले आहे. शिक्षणाच्या परिवर्तनकारी शक्तीची जाणीव झाल्याने, ते त्यांच्या मातृभूमीकडे भावनिकरित्या ओढले जातात. त्यांची नैतिक जबाबदारी समजून ते त्यांच्या गावात शिक्षणाची गंगा आणण्याचा निर्णय घेतात. शाळा सुरू करताना त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते, ज्यामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी व्यवहार करणे आणि काही घटकांच्या विरोधावर मात करणे यांचा समावेश आहे. यात प्रशासकीय अधिकारी कशा प्रकारे रेखाला शाळा उभारण्यासाठी मदत करतात आणि पुढे दीपकच्या स्वप्नाला कशी खिळ लागते, हे उत्तमरित्या कथा, पटकथेद्वारे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या कथेला मिळणारी कलाटणी अनेकांना सुखद अनुभवातून दुःखद अनुभवाकडे घेऊन जाणारा आहे. या संघर्षामुळे पुढे चित्रपटाचा होणारा शेवट सर्वांना सुखावणारा आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community