Vihar Lake ही भरले, मुंबईकरांनो आता तुमची काही खैर नाही! 

12359
Vihar Lake ही भरले, मुंबईकरांनो आता तुमची काही खैर नाही! 
Vihar Lake ही भरले, मुंबईकरांनो आता तुमची काही खैर नाही! 
  • विशेष प्रतिनिधी
मुंबई महानगराची जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख ७ तलावांपैकी तुळसी, तानसा तलाव पाठोपाठ विहार तलावही (Vihar Lake) गुरुवारी सकाळच्या सुमारास ओसंडून  वाहू लागले. त्यामुळे आता लवकरच मोडक सागर  भरून वाहू लागेल,असा अंदाज आहे.पण विहार तलाव लवकर भरल्याचा आनंद होत असला तरी एक प्रकारे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडणारी बाब ही आहे. विहारचे पाणी मिठी नदीला जावून मिळत असून हे तलाव भरल्याने मिठीची पातळी वाढली जाणार आहे. त्यातच गुरुवारी ४.६५ मीटरची मोठी उंच भरती असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (Vihar Lake)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा लाख दशलक्ष लीटर एवढी आहे. सध्या या सर्व धरणात ६६.७७ टक्के अर्थात ९ लाख ६६ हजार ३९५ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. (Vihar Lake)
यापूर्वी तुळसी तलाव मागील आठवड्यात  भरले होते. त्यानंतर तानसा धरण हे बुधवारी सायंकाळी भरले. त्यानंतर गुरुवारी सकाळी विहार तलावही भरले गेले. आता प्रतीक्षा आहे ती मोडक सागर धरणाची. हे धरण ९८.६६ टक्के एवढे भरले असून पावसाचा असाच जोर राहिल्यास दिवसभरात  हे धरण भरून वाहू शकेल असा अंदाज आहे. (Vihar Lake)
विहार तलाव भरल्याने आता मुंबई महापालिकेची खरी कसोटी पाहायला मिळणार आहे. विहार धरणाचे पाणी हे मिठी नदीला येऊन मिळते. त्यामुळे मिठी नदीची पातळी वाढत जाऊन मुसळधार पावसात अनेक भागांमध्ये जलमय होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विहार तलाव लवकर भरल्याचा एक प्रकारे आनंद वाटत असला तरीही मुंबईकरांच्या  चिंतेत भर पाडणारी ही घटना  आहे, असे बोलले जात आहे.  (Vihar Lake)
गुरुवारी दुपारी २.५१ वाजता ४.६४ मीटर उंचीची मोठी भरती आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटे ३ वाजून १० मिनिटाला ४.१२ मीटर उंचीची मोठी भरती आहे. सकाळपासूनच पावसाची संततधार कायम असून कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरीता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधुनमधून ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली  आहे. (Vihar Lake)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.