Vijayakanth : दाक्षिणात्य अभिनेते, डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन

दाक्षिणात्य अभिनेते आणि डीएमडीके पक्षाचे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे आज म्हणजेच गुरुवार २८ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

296
Vijayakanth : दाक्षिणात्य अभिनेते, डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन

विजयकांत (Vijayakanth) हे ‘देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम’ (डीएमडीके) पक्षाचे संस्थापक होते. त्यांना मंगळवारी नियमित तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले होते. पक्षाकडून विजयकांत यांची प्रकृती ठीक आहे, तपासणीनंतर ते रूग्णालयातून घरी परततील असेही सांगण्यात आले होते. दरम्यान आज, गुरुवारी पक्षाकडून विजयकांत यांच्या विषयी माहिती देताना त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. दरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता निधन झाल्याचे वृत्त समोर आले.

(हेही वाचा – Fake Loan And Betting Apps : सरकारकडून बनावट कर्ज व बेटिंग अॅप्सवर बंदी; अॅप्सच्या जाहिराती तत्काळ हटवण्याचे आदेश)

उपचारांदरम्यान प्रकृती अधिक खालावली –

डीएमडीकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तर, रुग्णालयाने देखील याबाबत पुष्टी केली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये विजयकांत (Vijayakanth) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईच्या एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खोकला आणि घसादुखीमुळे गेले १४ दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली याच रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सिनेसृष्टीत योगदान –

‘कॅप्टन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजयकांत (Vijayakanth) यांनी तामिळ सिनेसृष्टीत त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी १५४ सिनेमांमध्ये काम केले होते. शिवाय दाक्षिणात्य सिनेविश्वात महत्त्वाचे बदल घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. नादीगर संगम अर्थात साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन (SIAA) मध्ये पदावर असताना विजयकांत यांनी दक्षिण चित्रपट उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत.

(हेही वाचा – Priyanka Gandhi ED : आता प्रियांका गांधी देखील ईडीच्या रडारवर)

राजकीय कारकीर्द – 

चित्रपटांनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि डीमडीकेची स्थापना केली. विरुधाचलम आणि ऋषिवंद्यम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत दोनदा विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. २००६ च्या विधानसभा निवडणुकीत आठ टक्के मतांसह आमदार झालेल्या विजयकांत (Vijayakanth) यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला होता. नंतर ते २०११ ते २०१६ पर्यंत तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते बनले. मात्र त्यांच्या प्रकृतीमुळे पक्षाचेही नुकसान झाले होते आणि राज्यातील सत्ताही गेली. कॅप्टन विजयकांत यांची प्रकृती गेल्या काही वर्षांपासून पक्षासाठी सातत्याने चिंतेची बाब होती. गेल्या काही काळात ते राजकीय घडामोडींचा भाग नव्हते. त्यांच्या पत्नी प्रेमलता पक्षाचा कारभार पाहत होत्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.