केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित “विकसित भारत संकल्प यात्रा” मोहिम महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात फिरत आहे. कोल्हापूरमधील पन्हाळा येथील माजगाव येथे आपला संकल्प विकसित भारत रथयात्रेचे नियोजन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारने ९ वर्षात केलेल्या कामांची माहिती देण्यात आली. तसेच या ठिकाणी “आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे” शिबीर घेण्यात आले. आरोग्य तपासण्या करण्यात आल्या, उज्जवला योजना स्टॉलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन देखील सर्व ग्रामस्थांना दाखवण्यात आले. (Vikasit Bharat Sankalp Yatra)
प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म देखील पात्र नागरिकांना देण्यात आले. निराधार पेन्शन योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना यांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. यावेळी माळवाडी गावचे सरपंच पूजा सुतार, ग्रामसेवक राजकूमार शिंदे तसेच इतर सदस्य, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा ताई, आरोग्य सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते. (Vikasit Bharat Sankalp Yatra)
(हेही वाचा – Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला का केले आपलेसे? वाचा सविस्तर…)
इतक्या ठिकाणी गेली संपल्प यात्रा
लातूर मध्ये देखील १३ डिसेंबर २०२३ रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी कुमठा बु, दुपारी कौडगाव, औसा तालुक्यात सकाळी उंबडगा खु., दुपारी उटी बु., चाकूर तालुक्यात सकाळी केंद्रेवाडी, दुपारी महालंगी, देवणी तालुक्यात सकाळी सावरगाव, दुपारी होनाळी, जळकोट तालुक्यात येवरी, दुपारी लाळी बु., लातूर तालुक्यात सकाळी बाभळगाव, दुपारी सिरसी, निलंगा तालुक्यात सकाळी कासारबालकुंदा व दापका, दुपारी पिरुपटेलवाडी व लांबोटा, रेणापूर तालुक्यात सकाळी सुमठाणा, दुपारी समसापूर, शिरुर अनंतपाळ तालुक्यात सकाळी तुरुकवाडी, दुपारी हाणमंतवाडी, उदगीर तालुक्यात सकाळी सोमनाथपूर, दुपारी क्षेत्रफळ येथे विकसित भारत संकल्प यात्रा गेली. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी, इत्यादी कामे करण्यात येत आहे. (Vikasit Bharat Sankalp Yatra)
(हेही वाचा – DRDO: चित्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड फ्लाईंग विंग युएव्ही विमानाची उड्डाण चाचणी यशस्वी)
२६,०५१ व्यक्तींची आरोग्य तपासणी
सांगलीमध्ये रथ यात्रेदरम्यान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. तपासणी, मोफत औषधोपचार व संदर्भ सेवा यासह आयुष्मान व आभा कार्डचे वाटपही करण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये १४ डिसेंबर अखेर २६,०५१ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली. (Vikasit Bharat Sankalp Yatra)
‘या’ योजनांची दिली माहिती
डॉ. मिलिंद पोरे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आयुष्मान भारत, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान, यासह आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये १४ डिसेंबर अखेर २६,०५१ व्यक्तींची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार व संदर्भ सेवा देण्यात आली. (Vikasit Bharat Sankalp Yatra)
‘इतक्या’ लाभार्थींचे बनवले आयुष्मान कार्ड
यामध्ये ११०० व्यक्तींची उच्च रक्तदाब, १९४३ व्यक्तींची मधुमेह, १३३१ व्यक्तींची क्षयरूग्ण तपासणी करण्यात आलेली आहे. ५१७ रुग्णांना ‘फुड बास्केट’ देण्यात आले, व १०२ जणांनी निक्षय मित्र म्हणून नोंदणी केलेली आहे. या कालावधीमध्ये १६,३०७ लाभार्थींचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहे. (Vikasit Bharat Sankalp Yatra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community