Vikhroli Railway Flyover चा खर्च आणखी ७ कोटींनी वाढला

एकूण खर्च पोहोचला १०४ कोटी रुपयांवर

1724
Vikhroli Railway Flyover चा खर्च आणखी ७ कोटींनी वाढला
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विक्रोळी रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे उड्डाणपुलाचा आणखी ७ कोटी रुपयांनी खर्च वाढला गेला आहे. सलग तिसऱ्यांना मूळ कंत्राट कामांच्या खर्चात वाढ करावी लागली असून हा एकूण खर्च आता १०४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (Vikhroli Railway Flyover)

विक्रोळीतील रेल्वे उड्डाणपुलाचे काम महापालिकेच्यावतीने मे २०१८ मध्ये सुरु झाले. महापालिकेच्यावतीने विविध करांसह ४५ कोटी रुपयांच्या कंत्राट कामाला मंजुरी दिली होती. यासाठी महापालिकेच्यावतीने एच. व्ही. कंस्ट्रक्शन कंपनीची निवड केली होती. त्यानंतर पुलाच्या बांधकामासाठी अरुंद रस्ता असल्याने व रेल्वे स्टेशनकडे जाणारा जोडणारा अति रहदारीचा असल्याने वाहतुकीसाठी अडथळा टाळण्यासाठी सुपर स्ट्रक्चर डिझाईनमध्ये बदल केले. त्यानुसार बांधकामाचा आराखडा बदलल्यामुळे विविध करांसह मंजूर केलेल्या ४५ कोटींचा खर्च दुपटीने वाढून विविध करांसह ८८.४५ कोटींवर जावून पोहोचले आहे. (Vikhroli Railway Flyover)

(हेही वाचा – Aaditya Thackeray नार्को टेस्टला का तयार नाही? शिवसेना आमदाराचा सवाल)

त्यानुसार तांत्रिक सल्लागार टेक्नोजेम कन्स्ल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या रचनेमध्ये फेरतपासणी सल्लागार आयआयटी मुंबईने मुख्य गर्डरच्या तळाच्या प्लेटची जाडी २५ मी. मी. वरून ३६ मी. मी. व ब्रेसिंग एँगल्सची जाडी १० मी. मी. ने वाढवण्याचे सुचविले. त्यामुळे पुन्हा एकदा याचा खर्च सुमारे ९ कोटी रुपयांनी वाढवून विविध करांसह एकूण ९७ कोटी ३७ लाखांवर जावून पोहोचला. (Vikhroli Railway Flyover)

त्यानंतर आता मुख्य गर्डरच्या वरच्या भागाच्या प्लेटची रुंदी वाढवण्याचे सुचवल्याने तसेच डेक स्लॅबीची जाडी ३०० मी. मी. वरून ३५० मी. मी. झाली. त्यानुसार स्लॅबमधील काँक्रिटचे व सळ्यांचे प्रमाण वाढले असल्याने याचा परिणामामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जादा व अतिरिक्त असा ७ कोटी ३९ लाख रुपये यावर खर्च वाढल्याने या पुलाचा आतापर्यंतचा एकूण खर्च विविध करांसह १०४ कोटी ७७ लाख रुपयांवर जावून पोहोचला आहे. दरम्यान, या विक्रोळी पुलाचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होऊन लोकांसाठी खुले केले जाईल असा दावा महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Vikhroli Railway Flyover)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.