Chandrayaan-3 चे विक्रम लँडर चंद्राजवळ पोहचले

चंद्रयान आणि चंद्र यांच्यात केवळ २५ किलोमीटरचे अंतर शिल्लक

247
Chandrayaan-3 चे विक्रम लँडर चंद्राजवळ पोहचले
Chandrayaan-3 चे विक्रम लँडर चंद्राजवळ पोहचले

चांद्रयान-३ मोहिमेशी संबंधीत महत्त्वाची बातमी पुढे आलीय. शनिवारी (१९ ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर चांद्रयान-३ चे विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहचले. त्यामुळे चांद्रयान आणि चंद्र यांच्यात केवळ २५ किलोमीटरचे अंतर शिल्लक असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) दिली.

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार या डिबूस्टिंग प्रक्रियेनंतर, लँडर २५ x १३५ किमीच्या कक्षेत पोहोचले आहे. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागापासून त्याचे कमाल अंतर १०० किमी आणि किमान अंतर ३५ किमी आहे. या सर्वात कमी अंतरावरून ते २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या दरम्यान, त्याचा वेग सुमारे २ मीटर प्रति सेकंद असेल. या मोहिमेसाठी येणारे काही क्षण खूप महत्त्वाचे असणार आहेत, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

(हेही वाचा – Plastic Ban : मुंबईत उद्यापासून प्लास्टिक पिशवी बंद, महापालिकेकडून कडक कारवाई सुरू)

सध्या चांद्रयान-३ शेवटच्या टप्प्यात आहे. पुढचे काही तास या मोहिमेसाठी महत्वाचे असणार आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा चांद्रयान ३ मोहिमेसमोर सर्वाधिक आव्हानात्मक स्थिती असेल. मात्र, आतापर्यंत सर्व काही वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे इस्रोचे म्हणणे आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की कोणत्याही अंतराळ मोहिमेच्या शेवटच्या क्षणांना ‘चिंतेचे शेवटचे क्षण’ असे संबोधले जाते. हीच वेळ आहे जेव्हा लँडर आणि रोव्हर त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरतात.

लँडर विक्रमला चंद्रावर सॉफ्ट लॅंडींगसाठी त्यांच्या मेमरीचा पुरेपूर वापर करावा लागणार आहे. सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने यांन लँडिंग योग्य जागा शोधेल. त्यानंतर त्याचा वेग कमी होऊन हळूहळू ते चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करेन. तसेच हे यान १२ अंश खाली झुकून चंद्रावर उतरेल. यानंतर प्रज्ञान रोव्हर यातून बाहेर येईल. ते १४ दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर चाचण्या आणि संशोधन करणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.