भारताचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार विक्रम मिस्त्री (Vikram Mistry) यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी मिस्त्री यांनी चिनमध्ये राजदूत म्हणून काम केलेय. आगामी १५ जुलै रोजी मिस्त्री आपला पदभार ग्रहण करणार आहेत. (Vikram Mistry)
भारतीय परराष्ट्र सेवेचे (आयएफएस) १९८९ बॅचचे अधिकारी असलेल्या विक्रम मिस्त्री यांनी यापूर्वी ३ पंतप्रधानांचे वैयक्तिक सचिव म्हणून काम केलेय. निवर्तमान परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांचा कार्यकाळ १२ मार्च रोजी संपुष्टात आला होता. परंतु, त्यांना १४ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता विक्रम मिस्त्री त्यांची जागा घेणार आहेत. मिस्त्री यांनी चीनमध्ये राजदूत म्हणून केलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलीय. त्यांनी २०१९-२०२१ दरम्यान बीजिंगमधील राजदूत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Vikram Mistry)
(हेही वाचा – Maharashtra Budget Session 2024 : अर्थसंकल्पावर विरोधक काय म्हणतात?)
विशेषत: मे २०२० मध्ये लडाख प्रदेशात लष्करी संघर्षानंतर इजिप्तने चीनसोबत मध्यस्थी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका वठवली होती. यापूर्वी, मिस्त्री (Vikram Mistry) यांनी स्पेन (२०१४-२०१६) आणि म्यानमार २०१६-२०१८) मध्ये राजदूत म्हणूनही काम केले आहे. त्यांनी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल (१९९७-१९९८), मनमोहन सिंग (२०१२-२०१४) आणि नरेंद्र मोदी (मे ते जुलै २०१४) यांचे वैयक्तिक सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांनी बेल्जियम, पाकिस्तान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, श्रीलंका आणि जर्मनी येथील भारतीय मिशनमध्येही काम केले आहे. (Vikram Mistry)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community