विलेपार्ले : घर कोसळून दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी

दुर्घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, रुग्णवाहिका, स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

240
विलेपार्ले : घर कोसळून दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी

शहरातील विले पार्ले परिसरात एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. रॉबिन रॉकी मिस्किटा (वय ७०) आणि प्रशिला रॉबिन मिस्किटा (वय ६५) अशी मृतांची नावे आहे. दरम्यान जखमींमध्ये सुमित्रादेवी (५३) यांची प्रकृती स्थिर आहे, तर आणखी एक व्यक्ती जखमी असून, तिची ओळख पटलेली नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. रविवार (२५ जून) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विले पार्ले येथील नानावटी रुग्णालयाच्या शेजारी असणाऱ्या एका रस्त्यावरून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक जात होती. सर्वजण आनंदात असतानाच अचानक एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला.

(हेही वाचा – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवासी खोळंबले; मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत)

दुर्घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, रुग्णवाहिका, स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. ही दुर्घटना घडली तेव्हा इमारतीखालून बरेच जण जात होते. मात्र ही गर्दी पुढे सरकल्याने अनेकांचे प्राण थोडक्यात बचावले.

दरम्यान, मुंबईत दोन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. अशातच दुसऱ्याच दिवशी ही दुर्घटना घडल्याने विले पार्ले परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.