आपले गाव ते पंढरपूर; आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळाची विशेष सुविधा

153

आषाढी एकादशीनिमित १० जुलै रोजी पंढरपूर यात्रा आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना विशेष सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने सुरू करण्यात आली आहे तसेच 40 व्यक्ती एकत्रित एसटी महामंडळाची बस बुक करू शकतात ही बस संबंधितांचे गाव ते पंढरपूरपर्यंत सेवा देईल.

( हेही वाचा : ‘DRDO’ ने तयार केले मानवरहित विमान)

गाव ते पंढरपूर विशेष सेवा

गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक पंढरपूरला येण्याची शक्यता लक्षात घेऊन गावातील वारकऱ्यांनी एकत्रितपणे बसचे बुकींग केल्यास त्यांना गावातूनच बससेवा मिळेल यासाठी 40 व्यक्तींची संख्या आवश्यक असून ही बस प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर परतीच्या प्रवासात पुन्हा त्यांच्या गावी सुद्धा सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.

विशेष गाड्यांचे नियोजन

औरंगाबाद -१२००, मुंबई -५००, नागपूर- १००, पुणे -१२००, नाशिक -१००० तर अमरावती येथून ७०० अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.