चंद्रपुरात अंधश्रद्धेचा बाजार : ग्रामस्थांनी एका कुटुंबाला ‘अशी’ दिली क्रूर वागणूक!

काही दिवसांपूर्वी गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आली होती. त्यांनी एका कुटुंबातील सदस्यांनी  गावातील ८ - १० वयोवृद्ध पुरुष आणि महिलांवर गावावर भानामती केल्याचे सांगितले होते.

समाजात आजही अंधश्रद्धेची पाळेमुळे घट्ट रोवलेली आहेत, याचा प्रत्यय चंद्रपुरात आला येथे येथे भानामती केल्याच्या संशयातून एका कुटुंबाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. गावकऱ्यांनी कुटुंबातील सात जणांना भरचौकात नेऊन त्यांचे हातपाय बांधून मारहाण केली. यात हे यामध्ये सातही जण जखमी झाले असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. संबंधित पाच गंभीर जखमींना चंद्रपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून लपवालपवी!

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील वणी खुर्द गावात घडली आहे. विशेष म्हणजे ही घटना घडून चोवीस तास उलटल्यानंतरही त्यासंबंधी पोलिसांनी ठोस कारवाई केल्याचे दिसत नाही. याउलट या घटनेत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण किती लोकांवर गुन्हा दाखल केला? किती लोकांना अटक केली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिस याप्रकरणी लपवालपवी करत आहेत.

(हेही वाचा : सासरच्यांच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या)

काय हे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी अंगात आली होती. त्यांनी एका कुटुंबातील सदस्यांनी  गावातील ८ – १० वयोवृद्ध पुरुष आणि महिलांवर गावावर भानामती केल्याचे सांगितले. त्यामुळे गावातील काही जणांनी त्या कुटुंबातील सदस्यांना गावातील चौकात आणले. येथील खांबाना सर्वांचे हातपाय बांधत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सात जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात तणावाच वातावरण तयार झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here