विमाननगर (Vimannagar Cylinder Detonation) भागातील रोहन मिथिला इमारतीच्या परिसरात बांधकाम मजुरांच्या वसाहतीत बुधवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी आग लागली. सिंबायोसिस कॉलेज (Symbiosis College), रोहन मिथिला इमारतीलगत असणाऱ्या होरिझन डेव्हलपर्स (Horizon Developers), निऑन साईटस् (Neon sites) या ठिकाणी कामगारांची पत्र्याचे शेड असलेली घरे होती.
(हेही वाचा – BJPची महाराष्ट्रात लोकसभेसाठी रणनीती ठरवण्याच्या हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार)
शेजारील एका पत्रा बांधकामाच्या ठिकाणी सुमारे १०० च्या आसपास घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा (Gas cylinder) साठा होता. त्या ठिकाणी अंदाजे १० ते १२ सिलेंडर फुटल्याने आग लागली. पुणे व पीएमआरडीए (PMRDA) अग्निशमन दलाच्या वाहनांनी वेळेत पोहोचून आग वेळेत विझवली.
या वेळी मोठा धोका टळला असून सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाचे (fire brigade) वाहन पोहोचले तेव्हा ही दोन सिलेंडरचे स्फोट (Cylinder Detonation) झाले. परंतू सदर सिलेंडर साठा कोणाचा याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. सद्यस्थितीत आग विझली असून कुलिंगचे काम सुरू आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठी साहित्य संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल – मुख्यमंत्री)
अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचल्याने व दुपारची वेळ असल्याने तिथे कामगार नव्हते. त्यामुळे सुदैवाने जखमी वा जिवितहानी टळली असून जर ही घटना राञीच्या वेळी घडली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती.
गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. स्फोटामुळे परिसरात अफवा पसरली. आगीत बांधकाम मजुरांची घरे जळाली. गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. (Vimannagar Cylinder Detonation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community