मणिपुरमध्ये मे महिन्यापासून सुरू असलेला जातीय हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मणिपूरमध्ये शनिवारी (५ ऑगस्ट) सुरक्षा दल आणि मेईतेई समुदायांमध्ये गेल्या २४ तासांपासून चकमक सुरू आहे. या हिंसाचारा दरम्यान तिघांचा मृत्यू झाला. तेरखोंगसांगबी कांगवे आणि थोरबुंग येथे हिंसक हा संघर्ष झाला. कुकी-मेईतेई मधील जी सीमा आहे त्या भागाला बफर झोन असे म्हणतात.
गुरुवार (३ ऑगस्ट) रोजी दुसर्या घटनेत बिष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुगकचाओ युनिटमध्ये शेकडो लोक जमले होते. यानंतर हल्लेखोरांच्या जमावाला हाताळण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना अश्रूधुरांचा वापर करावा लागला. मणिपूरमध्ये गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये ३४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी (४ ऑगस्ट) रात्री मेईतेई समुदायाच्या तीन लोकांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर समुदायाच्या काही लोकांनी अनेक घरांना आग लावली होती. गुरुवारी इम्फाळ पश्चिम येथे अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात ऋषी हा पोलिस ठार झाला. वृत्तानुसार, डोंगरी भागातील एका स्निपरने पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.
(हेही वाचा – मेट्रो वूमन आश्विनी भिडे यांना ‘महिला वूमन लीडरशिप २०२३’ पुरस्कार)
मणिपूरमध्ये ३ मे २०२३ पासून मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचारामुळे आतापर्यंत १५० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी ५० हजारांहून अधिक लोकांना छावणीत राहण्यास आणि राज्य सोडण्यास भाग पाडले जात आहे. अनेक महिन्यांपासून शाळा, महाविद्यालयेही बंद आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community