Syria मध्ये पुन्‍हा हिंसाचार; एक हजारांपेक्षा जास्त नागरिक ठार

सीरियन Syria ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या मते हिंसाचाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.

424
सीरियात Syria पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. मागील दोन दिवसांत तब्बल १ हजारांपेक्षा जास्त जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सीरियातील हा संघर्ष गेल्या १४ वर्षांच्या संघर्षातील सर्वात घातक ठरला असल्याचे म्हटले जात आहे. सीरियात सध्या सुरु असलेला हा संघर्ष सीरियन सुरक्षा दल आणि पदच्युत अध्यक्ष बशर अल असद यांच्या समर्थकांमध्ये सुरु आहे.
सीरियन Syria ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या मते हिंसाचाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. काही लोकांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी या संघर्षामुळे वीज आणि पाणी खंडित करण्यात आलेले आहे. या संघर्षात आणखी रक्तपात होण्याच्या भीतीने हजारो लोक Syria सुरक्षित ठिकाणी पळून गेले असल्याची माहिती सांगितली जाते. काही महिन्यांपूर्वी बशर अल असद देश सोडून पळून गेल्यानंतर सत्तेवर आलेल्या नवीन सरकारसमोर आता संघर्षाचे मोथे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारी दलांचं म्हणणं आहे की, बशर अल असदच्या समर्थकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला. यामध्ये सूड उगवणाऱ्याही काही घटना घडल्या. काही सुन्नी बंदूकधाऱ्यांनी असदच्या गटाला पाठिंबा देणाऱ्यांना लक्ष्य केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.