केनिया देशातल्या काकामेगा काउंटी येथील सेंट थेरेमा एरगी गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनींच्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी अर्धांगवायूचा (Paralysis 0f Schoolgirls) झटका आल्यामुळे या शाळेतील विद्यार्थिनी काही आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल आहेत. या मुलींच्या एकाच वेळी आजारी पडल्याचा व्हिडियो सोशल मिडियावर (Social media) व्हायरल झाला आहे.
मिडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, एक दिवस अचानक या मुलींच्या पायातली ताकद निघून गेली. या मुलींच्या रक्त आणि लघवीचे नमुने प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत. या मुलींना चालायला त्रास होत होता. त्यांच्यामध्ये गुडघेदुखीची लक्षणेही दिसत होती. शाळेतच हे असं का घडलं याविषयी चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मुलींचा ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडियोमध्ये विद्यार्थिनी हॉस्पिटलच्या बेडवर थरथर कापताना दिसत आहेत. त्यांना व्यवस्थित चालताना येत नाही. या विद्यार्थिनींच्या आरोग्याची स्थिती पाहता सेंट थेरेसा एरेगी गर्ल्स हायस्कूलच्या अधिकाऱ्यांनी शाळा बंद केली असून या मुलींच्या तब्येतीत सुधारणा होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – Asian Games 2023 : पाकिस्तानला धूळ चारत अंतिम फेरीत भारतीय संघ यांच्याशी करणार कबड्डी.. कबड्डी… कबड्डी)
ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडियोमध्ये एक दोन नव्हे, तर तब्लल ९० शाळेतल्या मुलींना अर्धांगवायूचा झटका आला आहे. हा आकडा ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. सोशल मिडियावर मुलींचा व्हिडियो व्हायरल झाल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.
VIDEO: A significant number of students from St. Theresa’s Eregi Girls High School in Kenya have been admitted to the hospital due to an unexplained ailment. The majority of these girls are reportedly experiencing paralysis in their legs, leaving them incapable of walking. #kenya pic.twitter.com/1sPuMbIzPH
— Prince Carlton 🇺🇸 (@_PrinceCarlton_) October 5, 2023
हा आजार शरीरातील द्रवपदार्थांच्या असंतुलनामुळे होऊ शकतो. जेव्हा शरीरातील खनिजांचे प्रमाण खूप कमी किंवा जास्त होते, तेव्हा अशा प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. अस्वस्थता, अशक्तपणा, मुंग्या येणे, थकवा, ह्दय जोरात धडधडणे, मळमळ किंवा उलट्या, कमी किंवा उच्च रक्तदाब ही काही लक्षणे स्थानिक अहवालात देण्यात आली आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community