Virar मध्ये रेल्वे रुळ वाकवला की वाकला; नागरिकांनी वर्तवली घातपाताची शक्यता

105
Virar मध्ये रेल्वे रुळ वाकवला की वाकला; नागरिकांनी वर्तवली घातपाताची शक्यता
Virar मध्ये रेल्वे रुळ वाकवला की वाकला; नागरिकांनी वर्तवली घातपाताची शक्यता

नववर्षाच्या पूर्व संध्येला दि. ३१ डिसेंबर रोजी विरारकडून नालासोपाराकडे (Nalasopara) येण्यासाठी असणाऱ्या रेल्वे मार्गिकेवरील रुळ वाकल्याचे एसी लोकलच्या मोटरमनच्या लक्षात आले. त्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेता एसी लोकलच्या मोटरमनने लगेचच लोकल थांबण्याचा निर्णय घेतला. ही घटना दुपारी पावने एकच्या सुमारास मोटरमनच्या लक्षात आली. लोकल थांबून असल्याने बराच वेळ प्रवाशांचा खोळंबा झाला. तर काही प्रवाशांना पायी प्रवास करीत स्थानक गाठावे लागले. (Virar)

( हेही वाचा : Farmer : केंद्राकडून शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट; खताच्या किमती नियंत्रणात आणणार

दरम्यान समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रानुसार, रेल्वे रुळ बरेच वाकल्याचे यावेळी निदर्शनास आले. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ रेल्वे मार्गिका दुरुस्तीचे काम सुरु केले. तीन ते चार तास मार्गिकेवरील काम पूर्ण होण्यास वेळ लागला. पण यासगळ्यात घातपाताची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली. कारण ज्या पद्धतीने रेल्वे रुळाची छायाचित्रे होती. त्यानुसार अशापद्धतीने रेल्वे रुळ नैसर्गिकरित्या वाकणे अशक्य आहे, असे ही स्थानिकांचे म्हणणे आहे. परंतु या सर्वात मोटरमनने दाखवलेली सतर्कता नक्कीच कौतुकास्पद आहे. एका एसी लोकलमधून अंदाजे ४ हजार ५०० लोक एकाच वेळी प्रवास करत असतात. त्यामुळे मोटरमनने सतर्कता दाखवली नसती तर मोठा अनर्थ झाला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (Virar)

याआधी घडलेल्या घातपाताच्या घटना

– ओडिशातील (Odisha) बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातातील 300 जणांचा मृत्यू झाला होता. यात रेल्वे कर्मचाऱ्याने चुकीचा सिग्नल दिल्याचे उघड झाले. हा रेल जिहादचा भाग होता, असा संशय तपास यंत्रणांना होता.

– मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूरमध्ये लष्कराच्या स्पेशल ट्रेनसमोर 10 डिटोनेटरचा स्फोट झाला. ही ट्रेन जम्मू-काश्मीरहून कर्नाटकला जात होती, ज्यामध्ये लष्कराचे जवान आणि अधिकारी होते. मात्र, स्फोटाची तीव्रता कमी असल्याने ट्रेनचे कोणतेही नुकसान झाले नाही. या प्रकरणात साबीर या आरोपीला अटक करण्यात आली.

– उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पुन्हा एकदा पाच किलोचा संशयास्पद सिलिंडर रेल्वे ट्रॅकवर सापडला. हा सिलिंडर रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता, ते पाहून लोको पायलटने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावला आणि संभाव्य अपघात टळला. ही घटना काही लोक जाणूनबुजून ट्रेनचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे द्योतक आहे.

– कानपूर येथे मालगाडी उलटवण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅकवर सिलिंडर ठेवण्यात आला होता. मात्र गँगमनच्या प्रसंगावधानाने हा अपघात टळला.

– पंजाबमधील भटिंडा येथे लोहमार्गावर लोखंडी पट्टी पडलेली आढळून आली. येथेही लोको पायलटने वेळेवर ट्रेन थांबवून मोठा अपघात टळण्यात यश मिळविले. ट्रेन रुळावरून घसरावी म्हणून ही लोखंडी पट्टी मुद्दाम ठेवण्यात आल्याचे समजते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.