Virar मध्ये ४५ गोणी गोमांस; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह गोरक्षकांचा रेल्वे स्थानकाला घेराव

45
Virar मध्ये ४५ गोणी गोमांस; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह गोरक्षकांचा रेल्वे स्थानकाला घेराव
Virar मध्ये ४५ गोणी गोमांस; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह गोरक्षकांचा रेल्वे स्थानकाला घेराव

विरार (Virar ) रेल्वे स्थानकात दि. २१ डिसेंबर रोजी फलाट क्रमांकवर पाचवर ४५ गोणी मांस जप्त करण्यात आले आहे. यावेळी अवैधरित्या अल्पसंख्याक समुदायातील काही लोक गोमांसाचे तुकडे विरार रेल्वे स्टेशनवर (Virar Railway Station) आणले जात असल्याची माहिती बजरंग दल आणि गोरक्षकांना मिळाली होती. त्यामुळे बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी आणि गोरक्षकांनी विरार स्थानकाला घेराव घातला. त्यावेळी त्यांना ४५ गोणी गोमांस आढळून आले.

( हेही वाचा : Migrantion : सर्वांगीण विकासामुळे देशातंर्गत नागरिकांच्या स्थलांतरांत १२ टक्क्यांनी घट; ‘ईएसी-पीएम’ चा अहवाल प्रसिद्ध

दरम्यान याप्रकरणी बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी आणि गोरक्षकांनी गोणीमध्ये गोमांस असल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी हे गोमांस नसून कोंबडीचे मांस असल्याचे सांगितले. परंतु हे मांस कुठे आणण्यात आले, यासंदर्भात कुठलीच माहिती मिळालेली नाही. तसेच यासंदर्भातील कोणतीच पावती आणि रेल्वेचे तिकिट या अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांकडे नव्हते. तरीही रेल्वे प्रशासनाने कोणतीच कारवाई केली असून त्यांना सोडण्यात आल्याचा दावा गोरक्षकांनी केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही गोरक्षकांनी केला आहे.

याप्रकरणी बजरंग दलाचे (Bajrang Dal) कार्यकर्ते म्हणाले की, आम्ही मांसाच्या ४५ गोणी पकडल्याचे सांगितले. मात्र ही गोणी घेऊन जाणाऱ्या अल्पसंख्याक समुदायाची लोक मांसाच्या गोणी घेऊन निघून गेले. आम्हाला माहिती मिळाली होती की, रेल्वेतून गोमांस आणले जात होते. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला संबंधित घटनेची माहिती दिली. त्यामुळे प्रशासनाने प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन गोमांस असल्यास संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी आणि गोरक्षकांनी केली आहे. (Bajrang Dal) (Virar Railway Station)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.