Virus : गुजरातचा चांदीपुरा व्हायरस, महाराष्ट्रात झिका आणि केरळात निपाह व्हायरसचा धुमाकूळ; केंद्रीय आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

223
Virus : गुजरातचा चांदीपुरा व्हायरस, महाराष्ट्रात झिका आणि केरळात निपाह व्हायरसचा धुमाकूळ; केंद्रीय आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
Virus : गुजरातचा चांदीपुरा व्हायरस, महाराष्ट्रात झिका आणि केरळात निपाह व्हायरसचा धुमाकूळ; केंद्रीय आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ तिन्ही राज्यात व्हायरसमुळे (Virus) केंद्र सरकार आणि राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. गुजरातचा चांदीपुरा व्हायरस (Chandipura virus), महाराष्ट्रात झिका (Zika virus) आणि केरळात निपाह व्हायरसमुळे (Nipah virus) सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्रात सध्या २८ झिका व्हायरस बाधित रुग्ण आढळून आले होते. केरळात निपाह व्हायरसमुळे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसमुळे जवळपास २७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्र सरकारने तिन्ही राज्यातील व्हायरसची वाढती डोकेदुखी लक्षात घेवून केंद्रीय स्तरावर एक कमिटी स्थापन केली आहे. तिन्ही राज्यातील केंद्रीय यंत्रणेसोबत केंद्राची कमिटी बारकाईने काम करणार आहे. केंद्र सरकारने तिन्ही राज्यांना खबरदारीच्या उपाय योजना घेण्याची सूचना दिली आहे. व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी आणि तांत्रिक बाबीवर मदत मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कमिटी स्थापित केली आहे.

चांदीपुरा व्हायरसचा झपाट्याने वाढ
केरळातील मुलीला तापाची तीव्र लक्षणे आढळून आली दवाखान्यात भरती करण्याआधीच मुलीची प्राणज्योत मालवली. पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरालॉजी विभागाकडे मुलीच्या व्हायरसचे विषाणू तपासासाठी पाठवण्यात आले होते. रिपोर्टमध्ये निपाह व्हायरसमुळे जीव गेल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये सुद्धा चांदीपुरा व्हायरसचा झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत ७१ प्रकरण चांदीपुरा व्हायरसची समोर आली आहेत.

विशेष वैद्यकीय कक्ष
झिका व्हायरसची महाराष्ट्रात ३४ जणांना लागण झाल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये राज्यातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यसरकारकडून झिका व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरस आढळून आलेल्या जिल्ह्यात विशेष वैद्यकीय कक्ष उभारले जात आहेत. ताप आढळून आलेल्या किंवा गर्भवती महिलेला काही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.