Visa Service : कॅनडाची मुंबईसह बंगळूर आणि चंदीगड येथील व्हिसा सेवा स्थगित

कॅनडाने भारतापुढे शरणागती पत्करत, आपल्या ४१ अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे.

97
Visa Service : कॅनडाची मुंबईसह बंगळूर आणि चंदीगड येथील व्हिसा सेवा स्थगित
Visa Service : कॅनडाची मुंबईसह बंगळूर आणि चंदीगड येथील व्हिसा सेवा स्थगित

कॅनडाने (Canada) मुंबईसह (Mumbai)  बंगळूर (Bangalore) आणि चंदीगड (Chandigarh) या तीन शहरांतील व्हिसा सेवा स्थगित (suspended) (Visa Service ) करण्यात आली आहे. कॅनडाच्या व्हिसा प्रक्रिया स्थगितीच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा फटका बसणार आहे, मात्र नवी दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयात वैयक्तिक कॉन्सुलर सेवा उपलब्ध राहतील.

भारतानेदेखील महिनाभरापूर्वी कॅनडातील व्हिसा प्रक्रिया स्थगित केली होती. यानंतर भारतानेही व्हिसासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तत्पूर्वी कॅनडाने भारतातील ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना आज कॅनडात परतण्याचे आदेश दिले आहेत.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची यावर्षी जूनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी भारत सरकारचा संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यानंतर भारत-कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारताने हे आरोप ठामपणे नाकारले आहेत. दरम्यान, भारताने कॅनडाला त्यांच्या भारतातील अधिकाऱ्यांना परत बोलवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर कॅनडाने भारतापुढे शरणागती पत्करत, आपल्या ४१ अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. भारताच्या या धोरणानंतर कॅनडाने बंगळुरू, चंदीगड आणि मुंबईमध्ये व्हिसा आणि वैयक्तिक कॉन्सुलर सेवेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

(हेही वाचा – Mumbai Police : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या अडचणी वाढणार; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई)

कॅनडाचं मत…
कॅनडा आणि भारतातील अलीकडील घडामोडींच्या संदर्भात, पारंपरिक मीडिया आणि सोशल मिडियावर कॅनडाबद्दल निषेध आणि काही नकारात्मक भावना व्यक्त केल्या जात होत्या. कॅनडाविरोधी निषेधांसह निदर्शने होऊ शकतात आणि कॅनेडियन लोकांना धमकी किंवा त्रास दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीसह अनोळखी व्यक्तिंसोबत कमी संपर्क ठेवावे आणि त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्यासोबत शेअर करू नये. सार्वजनिक वाहतुकीसाठी गर्दीची ठिकाणे टाळणे, तुम्ही नेहमी कोणासोबत प्रवास करता याविषयी मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला कळवावे. व्यक्तिगत कॉन्सुलर सेवा बेंगळुरू, चंदीगड आणि मुंबईच्या आसपास तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध नाहीत, अशी माहिती कॅनडाने भारतासाठीच्या प्रवास सल्लागारात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.